सांगलीः कवठेमहाकांळ तालुक्यातील खरशिंग येथील श्रीक्षेत्र दंडोबा पायथ्याशी असणार्या श्रीराम मंदिर, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पादूका मंदिरात 18 ते 25 डिसेंबर दरम्यान श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव आयोजित करण्यात आला आहे.18 डिसेंबर रोजी कोठीपुजन व धर्मध्वज उभारणी होणार आहे. अशी माहिती मंदिराचे ट्रस्टी प्रदीप सव्वाशे,संगीता सव्वाशे यांनी दिली. दररोज पहाटे 5.30 वाजता काकड आरती,7.45 ते 10 वाजेपर्यत पोथीवाचन,दुपारी बारा वाजता आरती,
महाप्रसाद,सायंकाळी उपासना असे दैनंदिन कार्यक्रम आहेत.19 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता ह.भ.प.शरद गुरव(तुंग)यांचे किर्तन,ोण्णास्वामी मठ भजनी मंडळाचे भजन,20 रोजी शलाका काळे यांचे सुगम संगीत, ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ,सांगली यांचे भजन,21 रोजी ह.भ.प. अनघा पटवर्धन यांचे किर्तन,विष्णूसहस्त्रनाम व गीते,नामसाधना मंडळ,सांगली,22 रोजी सद्गुरु शहाजी पांढरे महाराज,हणबरवाडी मठयांचे प्रवचन,तर सुगंध महिला मनडळ चिंतामणीनगर यांचे भजन,23 रोजी आर.डी.कुलकर्णी आणि सहकार्यांचे गीतरामायण,,यशवंतनगरमधील भाऊली भजनी मंडळाचे भजन,24 रोजी धामजी महाराज ,लिंगनूर, यांचे प्रवचन, रामकृष्णहरी भजनी मंडळ,खरशिंग -हरोली यांचे भजन,25 रोजी ह.भ.प.सद्गुरु गुरुनाथ कोटणीस महाराज यांची प्रवचन,तर संकेत सुतार यांचा अभंगवाणी हा अभंग,भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे.
खरशिंग येथील गोंदवलेकर महाराज पादूका मंदिरात होणार्या पुण्यतिथी उत्सवात दररोज मोठ्या प्रमाणात नामस्मरण होणार आहे.19 डिसेंबर सकाळी सहा वाजता ते 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.15 वाजेपर्यत अखंड नामस्मकरण पहारा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.