वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी भारताला मोठी धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी भारतावर परस्पर कर (रेसिप्रोकल टॅक्स) लादण्याची धमकी दिली. भारत अमेरिकन वस्तूंवर जसा कर लावतो तसाच कर अमेरिका भारतीय वस्तूंवर लावेल असे त्यांनी म्हटले आहे.
मार-ए-लागो येथे पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी हे विधान केले. ते म्हणाले, जर त्यांनी आमच्यावर कर लावला तर आम्ही त्यांना समान कर लावू. ते आमच्यावर कर लावतात. जवळजवळ सर्व बाबींमध्ये ते आमच्यावर कर लावत आहेत मात्र आम्ही त्यांच्यावर कर लावत नाही.
जर भारत आमच्याकडून 100 टक्के शुल्क आकारत असेल तर आम्ही त्यांच्याकडून काही आकारत नाही का? ते सायकल पाठवतात आणि आम्ही त्यांना सायकल पाठवतो. ते आमच्याकडून 100 आणि 200 रुपये घेतात. भारत खूप जास्त शुल्क आकारतो. जर त्यांना आमच्याकडून शुल्क आकारायचे असेल तर ते ठिक आहे, परंतु आम्ही त्यांच्याकडून तेच शुल्क आकारू.
दरम्यान, यापूर्वी ट्रम्प यांनी कॅनडाला इशारा दिला होता की ते अमेरिकेत ड्रग्ज आणि अवैध स्थलांतरितांचा प्रवाह रोखण्यात अयशस्वी झाल्यास त्यांच्या प्रशासनाच्या पहिल्या दिवसापासून ते कॅनडावर 25% शुल्क लागू करतील. ट्रम्प यांनी डेट्रॉईट इकॉनॉमिक क्लबच्या सदस्यांशी बोलताना हार्ले डेव्हिडसन बाईकवरील आयात कराचे उदाहरण देत भारत हा सर्वात मोठा चार्जर असल्याचा आरोप केला.याआधी, ट्रम्प यांनी चीनमधून आयात केलेल्या वस्तूंवर शुल्क वाढवण्याची धमकी दिली आहे आणि असेही म्हटले आहे की यूएस सरकार टिकटॉकची चीनी मूळ कंपनी बाइटडान्सला सोशल मीडिया ॲप विकण्यास भाग पाडेल किंवा ट्रम्प कार्यकाळ सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला अमेरिकेमध्ये बंदी घालेल. 19 जानेवारीची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
युक्रेन युद्ध संपवण्यासाठी आपण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथील पाम बीच येथील त्यांच्या रिसॉर्टमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गाझामधील युद्ध संपवण्यासाठी ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हमासला 20 जानेवारीपर्यंत सर्व 100 इस्रायली आणि इतर देशांतील ओलिसांची सुटका करण्यास सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.