Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"तुम्ही हाय प्रोफाईल आहात म्हणून...", Allu Arjun ला जामीन मिळताच हे काय म्हणाली कंगना राणौत?

"तुम्ही हाय प्रोफाईल आहात म्हणून...", Allu Arjun ला जामीन मिळताच हे काय म्हणाली कंगना राणौत?
 

आजचा दिवस अल्लू अर्जुनसाठी अतिशय कठीण गेला आहे. त्याच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाने जगभरातील कमाईत १००० कोटींचा आकडा पार केला असतानाच आज या अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली. 'पुष्पा 2' च्या स्क्रीनिंग दरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुनने हजेरी लावली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत अल्लू अर्जुनला अटक केली.

महिलेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 5 डिसेंबर रोजी चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम 105 आणि 118 (1) अंतर्गत अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी हैदराबादच्या नामपल्ली न्यायालयाने अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

हैदराबादच्या संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्या प्रकरणी सुपरस्टारला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, मात्र वकिलाने तेलंगणा उच्च न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अपील केले आणि तो मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी आता बॉलिवूडची 'पंगा कीन' आणि भाजप खासदार कंगना राणौतने या प्रकरणी तिचं मत व्यक्त केलं आहे. अल्लू अर्जुनच्या अटकेवर काय म्हणाली कंगना राणौत?
'आजतक अजेंडा' या कार्यक्रमात भाजप खासदार कंगना राणौत सहभागी झाली होती. यावेळी तिने आजच्या संपूर्ण घटनेबद्दल तिची प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, "मी अल्लू अर्जुनची खूप मोठी समर्थक आहे, पण तुम्ही एक उदाहरण मांडले पाहिजे. आपण हाय-प्रोफाइल लोक आहोत, याचा अर्थ असा नाही की आपल्याला परिणामांना सामोरे जावे लागणार नाही. लोकांचे जीवन खूप मौल्यवान आहे." ती पुढे म्हणाली की, "मला वाटतं, थिएटरमध्ये प्रोटोकॉल असले पाहिजेत, जिथे सुरक्षेच्या गोष्टीवर विशेष लक्ष देण्यात यावे. प्रत्येकाला त्याची जबाबदारी माहित असायला पाहिजे."

 

अनेक सेलिब्रिटींनी केला अल्लू अर्जुनला सपोर्ट

'पुष्पा 2' ची अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने अल्लू अर्जुनला सपोर्ट केला आहे. तिने आपल्या एक्स हँडलवर लिहिले की, "घडलेली ही घटना अत्यंत दुःखद घटना आहे. मात्र, प्रत्येक गोष्टीसाठी एकाच व्यक्तीला दोषी ठरवले जात असल्याचे पाहून निराशा होत आहे." बॉलिवूड अभिनेता वरुण धवननेही अल्लू अर्जुनला पाठिंबा दिला आहे. 'बेबी जॉन'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये तो म्हणाला की, "सुरक्षा किंवा इतर काहीही एकट्या अभिनेत्याची जबाबदारी नाही. घडलेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. पण यासाठी तुम्ही कोणत्याही एका व्यक्तीला दोष देऊ शकत नाही."

विवेक ओबेरॉयनेही अल्लू अर्जुनच्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तो म्हणाला, "या दुर्घटनेसाठी अल्लू अर्जुनला अटक करणे योग्य आहे का?" अल्लू अर्जुनच्या अटकेवर काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "हे पूर्णपणे चुकीचे आहे. अशा प्रकारची अटक सहसा केवळ मीडियासाठी असते. हे थांबले पाहिजे, योग्य प्रक्रिया पाळली पाहिजे." अल्लू अर्जुनच्या अटकेवर आतापर्यंत मौन बाळगणारे 'पुष्पा 2' चे दिग्दर्शक सुकुमार शुक्रवारी अल्लू अर्जुनच्या घरी आले. अल्लू अर्जुनचा जवळचा मित्र राणा दग्गुबतीही त्याच्या घरी पोहोचला, त्यानंतर उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला.

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र केटी रामा राव यांनी अल्लू अर्जुनवरील पोलिस कारवाईबद्दल तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. इतकंच नाही, तर त्यांनी या अटकेला "सत्ताधाऱ्यांच्या असुरक्षिततेचे" उदाहरण म्हटले.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.