Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'या' तारखेपर्यंत मोफत अपडेट करा Aadhaar Card, अन्यथा नंतर भरावे लागेल शुल्क

'या' तारखेपर्यंत मोफत अपडेट करा Aadhaar Card, अन्यथा नंतर भरावे लागेल शुल्क
 
 
मुंबई : आधार कार्डमधील माहिती अपडेट करायची असल्याचे तुमच्याकडे कमी वेळ आहे. आधारमधील माहिती मोफत अपडेट करण्यासाठी 14 डिसेंबर 2024 ही अंतिम मुदत आहे. यापूर्वी मोफत अपडेटची अंतिम मुदत 14 जून 2024 होती, जी 14 सप्टेंबर 2024 आणि आता 14 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यानंतर अपडेट करण्यासाठी शुल्क आकारले जाईल. त्यामुळे तुमची आधार माहिती वेळेत दुरुस्त करा आणि मोफत सेवेचा लाभ घ्या.


घरी बसून मोफत अपडेट

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने जाहीर केले आहे की लोक 14 डिसेंबर 2024 पर्यंत त्यांची आधार कार्ड माहिती जसे की नाव, पत्ता किंवा जन्मतारीख विनामूल्य अपडेट करू शकतात. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या घरच्या आरामात तुमची माहिती सहज अपडेट करू शकता.
आधार अपडेट का आवश्यक?

यूआयडीएआयने लोकांना सुचवले आहे की तुमची आधारमधील माहिती अपडेट करून 10 वर्षांहून अधिक काळ झाला असेल तर ती अपडेट करा. त्यातून तुम्हाला अनेक फायदे मिळतील. तुमची सध्याची माहिती आधारमध्ये अपडेट केली जाईल. तुम्ही खाजगी आणि सरकारी सेवांचा लाभ घेऊ शकता. तुम्ही आधार पडताळणी माहिती सहज अपडेट करू शकता.

आधार ऑनलाइन कसे अपडेट करायचे

- यूआयडीएआय वेबसाइटवर जा: myaadhaar.uidai.gov.in वर लॉग इन करा.
- अपडेट विभाग निवडा आणि ‘माय आधार’ अंतर्गत ‘अपडेट युवर आधार’ पर्यायावर क्लिक करा.
- तपशील अपडेट पृष्ठावर जा आणि ‘अपडेट आधार तपशील (ऑनलाइन)’ निवडा आणि ‘दस्तऐवज अपडेट’ वर क्लिक करा.
- क्रेडेन्शियल्स एंटर करा, तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा भरा, त्यानंतर ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करा.
- ओटीपीने लॉगिन करा. तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या ओटीपीने लॉग इन करावे लागेल.
अपडेट पर्याय निवडा. तुमचे नाव, पत्ता इ. अपडेट करण्यासाठी फील्ड निवडा.
- दस्तऐवज अपलोड करा. आवश्यक माहिती भरा आणि सबमिट बटण दाबा.
- सादर केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल. आता अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) सेव्ह करा.

आधारमधील या अपडेट्ससाठी तुम्हाला केंद्रावर जावे लागेल

- बायोमेट्रिक बदल : बुबुळ, फिंगरप्रिंट, मोबाईल नंबर किंवा फोटोसाठी अपडेट फक्त ऑफलाइन केले जाऊ शकतात.
- एक-वेळ बदल : जन्मतारीख आणि लिंग ही माहिती फक्त एकदाच अपटेड केली जाऊ शकतात.

ऑफलाइन कसे अपडेट करावे

- ज्यांना ऑफलाइन अपडेट करायचे आहे त्यांना केंद्रावर जावे लागेल. अपडेट करण्यासाठी फी देखील भरावी लागेल
- यूआयडीएआय वेबसाइटवरून आधार अपडेट फॉर्म डाउनलोड करा.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.