Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोणत्या प्राण्याचं दूध काळं असतं? 99 टक्के लोकांना नाही माहीत

कोणत्या प्राण्याचं दूध काळं असतं? 99 टक्के लोकांना नाही माहीत
 
 
दुधाला आहारामध्ये प्रचंड महत्त्व आहे. दुधामध्ये सर्व प्रकारची पोषण तत्त्वे असल्यामुळे त्याला पूर्ण आहार असं देखील म्हटलं जातं. दूध हे सामान्यपणे पांढऱ्या रंगाचं असतं. मात्र जगात असा एकमेव प्राणी आहे, ज्याचं दूध हे काळ्या रंगाचं असतं. आश्चर्याची गोष्टी म्हणजे इतर प्राण्यांच्या दुधामध्ये जे गुणधर्म आढळतात तेच गुणधर्म या प्राण्याच्या दुधामध्ये देखील आढळतात. मात्र या प्राण्याच्या दुधाचा रंग हा काळ असतो.आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वात महाग दूध हे गाढवाचं विकलं जातं. उंटाच्या दुधापासून दही तयार होत नाही. मात्र हे अनेकांना माहिती नसले की कोणत्या प्राणांचं दूध हे काळं असतं. याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. 


गेंड्याचं दूध हे काळ्या रंगाचं असतं. या गेंड्याला ब्लॅक राइनोसेरॉस असं देखील म्हटलं जातं. इतर सर्व प्राण्यांचं दूध हे पाढंर असंत मात्र गेड्यांचं दूध हे काळं का असतं या मागे देखील एक कारण आहे. काळा गेंडा अर्थात ब्लॅक राइनोसेरॉस हा आफ्रिका खंडात आढळणारा गेंडा आहे. हा गेंडा पांढऱ्या गेंड्यापेक्षा थोडा वेगळा दिसतो. या दोन्ही गेंड्यांमधील मुख्य अंतर म्हणजे त्यांचे होठ. काळ्या गेंड्याचे होठ हे टोकदार असतात. त्यामुळे त्यांच्या खाण्याच्या सवयीमध्ये देखील मोठा फरक आहे. काळ्या गेंड्यांचा आकार हा पाढऱ्या गेंड्यांच्या तुलनेत अधिक मोठा असतो.

काळ्या गेंड्याचं दूध हे पांढरंच असंत मात्र त्यामध्ये इतर प्राण्यांच्या तुलनेत फॅट खूप कमी असतात. काळ्या गेंड्याच्या दुधात फक्त 0.2 टक्के एवढेच फॅट असतात. तसेच इतर पोषण तत्त्व देखील खूप कमी असतात. थोडक्यात अशा गोष्टी ज्यामुळे सुर्याची किरणं परावर्तीत होऊन त्या पाढंऱ्या दिसतात. त्या सर्व गोष्टी या दुधात नसतात. त्यामुळे हे दूध काळं दिसतं. 

काळ्या गेंड्याच्या दुधात फॅट कमी असल्यामुळे मादी गेंड्याचा प्रेग्नेन्सी काळ देखील मोठा असतो. तब्बल बारा महिने लागतात. त्यानंतर हा प्राणी आपल्या पिल्लांना जन्मानंतर दोन वर्ष आपल्यासोबत ठेवतो. त्याला दूध पाजतो. मात्र या दुधातून या पिल्लांना खूप कमी फॅट मिळतात.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.