नशिब बदलायला वेळ लागत नाही! जी व्यक्ती एका रात्री छताशिवाय झोपते, ती दुसऱ्या दिवशी राजवाड्यात उठू शकते. कुणाच्या नशिबात काय लिहिलं आहे, हे कुणालाही माहीत नसतं. काही लोक याला चमत्कार म्हणतील, पण हे खरे नशीबच आहे.
अशाच प्रकारचा चमत्कार सिंगापूरमध्ये एका भारतीय वंशाच्या व्यक्तीसोबत घडला. या व्यक्तीने आपल्या पत्नीसाठी सोन्याची चेन खरेदी केली आणि त्याच वेळी ती करोडपती बनली. एशिया वन या वेबसाइटनुसार, बालासुब्रमण्यम चिदंबरम नावाचे भारतीय वंशाचे प्रोजेक्ट इंजिनिअर गेल्या 21 वर्षांपासून सिंगापूरमध्ये राहत आहेत. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या पत्नीसाठी 3.8 लाख रुपयांची सोन्याची चेन खरेदी केली. त्यांनी ही चेन मुस्तफा ज्वेलरी या दुकानातून खरेदी केली.
या दुकानात दरवर्षी लकी ड्रॉ आयोजित केला जातो. किमान 15 हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे नाव या ड्रॉमध्ये समाविष्ट केले जाते. बालासुब्रमण्यम यांनी ठरावीक रकमेपेक्षा जास्त खरेदी केल्यामुळे त्यांचे नाव देखील या लकी ड्रॉमध्ये होते. 24 नोव्हेंबरला लकी ड्रॉचा निकाल जाहीर झाला आणि त्यात बालासुब्रमण्यम यांना 8 कोटी रुपयांची लॉटरी लागली.आश्चर्य म्हणजे, ज्या दिवशी त्यांना 8 कोटींचा पुरस्कार जाहीर झाला, तो दिवस त्यांच्या वडिलांच्या चौथ्या पुण्यतिथीचा होता. हा त्यांच्यासाठी एक आशीर्वाद होता. त्यांनी लगेचच आपल्या आईला ही आनंदवार्ता दिली. त्याचबरोबर त्यांनी आपल्या समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी काही रक्कम दान करण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ मुस्तफा ज्वेलरीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बालासुब्रमण्यम आणि इतर अनेक विजेते दिसत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.