Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लोकसेवा की लुटमार! अवघ्या 7 वर्षांच्या नोकरीत कॉन्स्टेबलने जमवली 'एवढी' संपत्ती, नोटांची थप्पी पाहून अधिकारीही थक्क

लोकसेवा की लुटमार! अवघ्या 7 वर्षांच्या नोकरीत कॉन्स्टेबलने जमवली 'एवढी' संपत्ती, नोटांची थप्पी पाहून अधिकारीही थक्क
 
 
भारतामध्ये सरकारी नोकरीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. नोकरीची सुरक्षितता हे यामागचे प्रमुख कारण असले तरीही अनेकजण आपल्या पदाचा गैरवापर देखील करत असल्याचे समोर आले आहे. असाच एक प्रकार मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधून समोर आला असून, येथे एका कॉन्स्टेबलच्या घरात कोट्यावधी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. कोट्यावधी रुपयांच्या नोटा बघून अधिकारी देखील थक्क झाले.

घरात सापडले 4 कोटी रुपये रोख
लोकायुक्त पोलिसांनी मध्यप्रदेशमधील परिवहन विभागात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत सौरभ शर्मा यांच्या दोन ठिकाणांवर छापेमारी केली. या छापेमारीमध्ये 4 कोटी रुपये रोख, 50 लाखांचे सोने-हिरे, 60 लाखांची चांदी सापडली. याशिवाय, 4 एसयूव्ही, 22 मालमत्तेची कागदपत्रे आणि 7 नोटा मोजण्याच्या मशीन देखील आढळून आल्या.

सौरभ शर्मा यांच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याची तक्रार लोकायुक्तकडे आली होती. यानंतर लोकायुक्तकडून कारवाई करत त्यांच्या घर व ऑफिसवर छापा मारण्यात आला. छापेमारीमध्ये शर्मा यांच्याकडे 4 गाड्या असल्याचे समोर आले. यातील एका गाडीत 82 लाख रुपयांनी भरलेली बॅग देखील आढळली. याशिवाय, लाखो रुपयांचे सोने, चांदी, हिरे देखील त्यांच्याकडे आढळून आले.
7 वर्षांच्या नोकरीत केला कारनामा

शर्मा यांचे वडील आरके शर्मा सरकारी डॉक्टर होते. त्यांचे 2015 साली निधन झाले. त्यानंतर अनुकंपातत्वावर सौरभ शर्मा यांना परिवहन विभागात नोकरी मिळाली. 7 वर्षांच्या नोकरीनंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्विकारली व बांधकाम क्षेत्रात काम करू लागले. अवघ्या 7 वर्षांच्या आपल्या नोकरीत त्यांनी एवढी मोठी बक्कळ बेहिशोबी संपत्ती जमा केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.