रूमवर बोलावलं, अन् सुरू झाला खरा खेळ; म्हातारपणातल्या 'जवानी'ने 60 वर्षांचा मुंबईकर आयुष्यातून उठला!
मुंबई : मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात एका 60 वर्षीय वृद्धाला अनैतिक संबंध ठेवल्याची मोठी किंमत मोजावी लागली. गेल्या काही दिवसांपासून तो एका महिलेच्या संपर्कात होता, मात्र हे नाते त्याला महागात पडले. आरोपी महिलेने तिची मुलगी आणि मित्राच्या मदतीने या वृद्धाला लुटले आहे.
धमक्या देऊन लुटण्याचा कट हा प्रकार तेव्हा उघडकीस आला, जेव्हा आरोपी
महिलेने वृद्धाला त्याच्या पत्नीला अनैतिक संबंधांबद्दल सांगेन, अशी धमकी
देण्यास सुरुवात केली.
या भीतीपोटी वृद्धाने महिलेच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्याने आरोपींना 37 लाख रुपये आणि इतर काही मौल्यवान वस्तूही दिल्या. आरोपी महिलेने त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. हा प्रकार वाढतच गेला आणि वृद्धाच्या जीवनात तणावाचे आणि भीतीचे वातावरण आले, शेवटी वृद्धाने पोलिसांकडे तक्रार केली.
12 डिसेंबर रोजी आरोपी महिलेने वृद्धाकडे दीड कोटी रुपयांची मागणी केली, त्यामुळे तो कंटाळला आणि तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला. तक्रारीत त्याने सांगितले की, आरोपी महिला आणि तिच्या मुलीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या वृद्धाने सांगितले की, आरोपी महिलेच्या दबावामुळे आपण आधीच मोठी रक्कम दिली होती, परंतु तरीही आरोपी आपला पिच्छा सोडण्यास तयार नव्हता. या प्रकरणी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून आरोपी महिलेच्या मित्राला अटक केली.
आरोपी फरार, पोलिसांचा शोध सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी महिला आणि तिची मुलगी अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेतील अन्य आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.