राज्य सरकारकडून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाचे एकमेव उद्दिष्ट्य म्हणजे समस्त बेरोजगार तरुण वर्गाला नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणे होय. या उपक्रमांतर्गत शहरी तसेच ग्रामीण भागातील लघुउद्योगांची मोठ्या प्रमाणात स्थापना केली जाते. हा उपक्रम क्रेडिट लिंक सबसिडी असून महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत राबविला जात आहे.
सरकारची तुफान चालणारी योजना :
सरकारच्या धोरणाप्रमाणे मागील पाच वर्षांमध्ये एकूण 1 लाखापेक्षा अधिक लघुउद्योग स्थापन करण्याचे धोरण हाती घेतले होते. या योजनेअंतर्गत ज्या व्यक्तींच्या अंगी कला साहित्यांचे गुण आहेत त्याचबरोबर बेरोजगार व्यक्तींसाठी या उपक्रमांतर्गत सहकार्य केले जाते. या कार्यक्रमाचा लाभ सामान्य महिला त्याचबरोबर बचत गटातील महिला देखील लाभ घेऊ शकतात. या धोरणाचे आवाहन ग्रामोद्योग अधिकारी एस.आर.खरात यांनी केले आहे.
जाणून घ्या अटी आणि नियम :
1. सर्वप्रथम ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे महाराष्ट्र शासनांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ केवळ तोच व्यक्ती घेऊ शकतो ज्यांनी आत्तापर्यंत शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही.2. यामध्ये 50 लाख ते 20 लाख रुपयांची कर्ज मर्यादा निश्चित केली आहे. या योजनेचा भाग होण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 45 या वयोगटादरम्यान असणे महत्त्वाचे आहे.
3. जे प्रकल्प दहा लाखांच्या अंतर्गत आहेत त्यासाठी सातवी उत्तीर्ण अर्जदारांची नावे घेतली जातील. 25 लाखांच्या प्रकल्पासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवाराला संधी दिली जाईल. त्याचबरोबर एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.4. अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत. ज्यामध्ये शैक्षणिक दाखला, आधार कार्ड, जातीचा दाखला, पॅन कार्ड, अंडरटेकिंग फॉर्म यांचा काय महत्वाच्या कागदपत्रांची गरज भासणार आहे.
अशा पद्धतीने करा अर्ज :
योजनेसाठी इच्छुक असणाऱ्या वर्गाने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी त्यांना https ://maha-cmegp.gov.in/homepage या संकेतस्थळावर भेट देऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. तुम्हाला जास्तीत जास्त माहिती गोळा करायची असेल तर तुम्ही अधिकृत कार्यालयात संपर्क साधू शकता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.