Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मी काय लल्लू पंजू आहे का? स्वत:ला शहाणे समजतात, भुजबळांनी 48 तासाची भडास एका दमात काढली, अजित पवारांना सुनावलं

मी काय लल्लू पंजू आहे का? स्वत:ला शहाणे समजतात, भुजबळांनी 48 तासाची भडास एका दमात काढली, अजित पवारांना सुनावलं
 

नाशिक : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ  यांनी मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर उघड नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.नाशिकमध्ये आज छगन भुजबळांनी अजित पवारांवरांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

मी काही लल्लू पंजू आहे का ? मकरंद पाटीलला मंत्री करण्यासाठी मला राज्यसभेवर पाठवायचं मी मूर्ख आहे का? असे म्हणत भुजबळांनी अजित पवारांना सुनावले आहे. तसेच ते स्वत:ला सर्वांपेक्षा जास्त हुशार आणि जास्त शहाणे समजतात असाही टोला लगावत भुजबळांनी आपल्या मनातील खदखदच व्यक्त केली आहे. छगन भुजबळ म्हणाले, मकरंद पाटीलला मंत्री करण्यासाठी मला राज्यसभेवर पाठवायचं मी मूर्ख आहे का? मी काही लल्लू पंजू आहे का?तुम्ही शब्द दिला म्हणजे काहीही करायचं का ? काय तर म्हणे...दादाचा वादा ... माझा लढा मंत्रिपदाचा नाही अपमान आणि अस्मितेचा आहे. मी असा वादा वगैरे मानत नाही ही लोकशाही आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या मंत्रीपदासाठी आग्रह धरला मात्र ऐकलं नाही . कारण हे सर्वांपेक्षा जास्त हुशार जास्त शहाणे समजतात.मी कुठेही जाणार नाही उद्या सर्वांचं म्हणणं ऐकून घेणार मग बघू .पुन्हा सगळं शून्यातून निर्माण करू.
ज्यांनी आपलं काम नाही केलं आपण त्यांचं काम करायचं. सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं. कोणाविषयी राग ठेवायचा नाही. आपण सगळे एकजुटीने काम करायचं आहे. अडचणीच्या काळात देखील विरोधकांना मदत करणार आहे. कोणाविषयी दुश्मनी विसरून जा... आरक्षणाचा भुलभूलैय्या संपणार आहे. काही लोकांनी अजित दादांना धन्यवाद दिले कारण मला मंत्री केलं नाही . मंत्रिपद अनेकदा मिळाली त्यामुळे आता नाही भेटलं त्याचा काय वाद नाही, असेही छगन भुजबळ म्हणाले.

...तर मी 100 टक्के मुख्यमंत्री झालो असतो
छगन भुजबळ म्हणाले, पहिल्यांदा मी महसूल मंत्री झालो आता त्यावरून पक्षांमध्ये भांडणं सुरू आहेत. विरोधी पक्षनेता झालो त्यावेळी पवारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केलं. 1999 साली जर काँग्रेस एकत्र असती तर मी 100 टक्के मुख्यमंत्री झालो असतो. मला सोनिया गांधींपासून अनेकांचे फोन होते की तुम्ही काँग्रेस सोडू नका तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहोत पण मी पवारांच्यासोबत गेलो. राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हा कोणाचा पत्ता नव्हता फक्त मी आणि पवार साहेब होतो.जेव्हा मुंबईत दहशत होती तेव्हा मी गृहमंत्री झालो . बच्चन ,शाहरुख मुंबई सोडून जाणार होते मी त्यांना थांबवलं आणि मुंबईतली दहशत संपवली. दाऊदचं नाव घ्यायला लोकं घाबरायचे
मी काही लहान बाळ आहे का? छगन भुजबळांचा सवाल

छगन भुजबळ म्हणाले, आपण लढायचं असतं घाबरून जायचं नसतं.माझा आवाज वाढलेलाच असतो. आमदारांचे घरं पेटवले तेव्हा माझी लढाई सुरू झाली. मग मी राजीनामा दिला होता. पोलीस हतबल झाले होते म्हणून मी पुढे येण्याचा निर्णय घेतला. होळीच्या दिवशी मला रस्त्यातून अजित दादांनी बोलावून घेतलं आणि मला लोकसभा लढायचं सांगितलं .जेव्हा मी म्हटल लोकसभा लढणार नाही मग त्यावेळी अजित दादांनी पुढे येऊन लगेच सांगायला पाहिजे होत ना... मी काय दूध पितो का ?मी काही लहान बाळ आहे का? मला समजत नाही का? साताऱ्याची जागा आम्ही भाजपला सोडली म्हणून एक राज्यसभा आम्हाला मिळाली होती.
....काय तर म्हणे दादाचा वादा

छगन भुजबळ म्हणाले, अजित दादांनी शब्द दिला म्हणजे काय? काही चर्चा आहेत की नाही. शरद पवार साहेब सुद्धा चर्चा करून निर्णय घ्यायचे. आठ दिवसांपूर्वीच समीर भाऊंना पटेल यांनी बोलावून घेतलं आणि सांगितलं की भुजबळांना राज्यसभेवर पाठवू. मकरंद पाटीलला मंत्री करण्यासाठी मला राज्यसभेवर पाठवायच. मी काही मूर्ख आहे का? इतरांना दिलेला शब्द पाळण्यासाठी भुजबळचा बळी घेणार का? मी 2 वर्षांनी जाणार असं बोललो. मी काही लल्लू-पंजू आहे का? चर्चा सुद्धा नाही केली की कोण मंत्री होणार आहे. माझी जर किंमत नाही तर मी काय करायला पाहिजे. तुम्ही शब्द दिला म्हणजे काहीही करायचं का? काय तर म्हणे दादाचा वादा

अजित दादाला जोडे मारो आंदोलन करू नका, कारण...
माझा लढा मंत्री पदाचा नाही. लढा अपमानाचा आणि अस्मितेचा आहे. मी असा वादा वैगेरे मानत नाही ही लोकशाही आहे. फडणवीसांनी आग्रह केला होता की काहीही करून भुजबळांना मंत्री करा ..पण ऐकलं नाही. कारण हे सर्वांपेक्षा जास्त हुशार ,जास्त शहाणे आहेत- प्रश्न मंत्रीपदाचा अजिबात नाही. बावनकुळे यांनी देखील नाराजी व्यक्त केली पण वादा आहे ना... मी कुठेही जाणार नाही... उद्या मी सर्वांचं म्हणणं ऐकून घेणार आहे मग बघू... निराश होऊ नका आणि खचून जाऊ नका. जहाँ नही चैना वहा नही रहना... पुन्हा सगळं शून्यातून निर्माण करू. सोशल मीडियावर अजिबात काही चुकीचं टाकू नका. अजित दादाला जोडे मारो आंदोलन करू नका कारण शहाण्याला शब्दांचे जोडे लागतात, असेही छगन भुजबळ म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.