Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दिल्लीतील 40 शाळांना बॉम्बची धमकी, पोलिसांचा तपास सुरू

दिल्लीतील 40 शाळांना बॉम्बची धमकी, पोलिसांचा तपास सुरू

 

दिल्लीतील शाळा, विमानतळ, हॉटेल्स आणि इतर ठिकाणी बॉम्बनं उडवण्याच्या धमक्या येण्याची मालिका संपण्याचे नावच घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून या धमक्यांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच पुन्हा एकदा दिल्लीतील 40 शाळांना बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.


सोमवारी (9 डिसेंबर) सकाळी 7.00 च्या सुमारास एकूण 40 शाळांना धमकीचे मेल असून या संदर्भात पोलीस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दिल्लीतील आरके पुरमच्या डीपीएस, पश्चिम विहारच्या जीडी गोएंका स्कूल, मदर मेरी स्कूलसह 40 शाळा व्यवस्थापनांना बॉम्बची धमकी देणारा ईमेल आला. अशा घटना थांबवण्यासाठी 30,000 डॉलर्सची मागणी या मेलद्वारे करण्यात आली आहे. सकाळी 7 च्या सुमारास हा मेल आल्यामुळे तोपर्यंत मुले त्यांच्या वर्गासाठी शाळेत पोहोचली होती. मात्र धमकीचे मेल आल्यानंतर शाळेच्या अधिकाऱ्यांनी लगेचच मुलांना घरी पाठवून पोलिसांना याबाबत कल्पना दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तपास सुरू केला असून अद्याप याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, याआधी देखील दिल्लीतील रोहिणी येथील एका खासगी शाळेला बॉम्बची धमकी देणारा ईमेल आला होता. यानंतर दिल्ली अग्निशमन विभाग आणि बॉम्ब शोधक पथकाचे जवान तपासणीसाठी शाळेच्या कॅम्पसमध्ये पोहोचले. मात्र तपासादरम्यान धमकीची अफवा आढळून आली. रोहिणीतील शाळेला धमकीचा कॉल येण्याआधी प्रशांत विहार परिसरात कमी तीव्रतेचा स्फोट झाला होता, त्यात एक जण जखमी झाला होता. या घटनेनंतर घटनास्थळी भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

दिल्लीत अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांकडून येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. 'दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची इतकी वाईट स्थिती दिल्लीच्या जनतेने यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. अमित शहा यांनी येऊन दिल्लीतील जनतेला उत्तर द्यावे', असे म्हणत अरविंद केजरिवाल यांनी अमित शहांना धारेवर धरले आहे.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.