Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

समुद्रातून पडकला हा दुर्मीळ प्राणी, शिजवून खाल्ला, कुत्र्यालाही खाऊ घातले, कुत्र्यासहीत 3 जणांचा मृत्यू, तज्ज्ञांनी सांगितलं नेमकं कारण

समुद्रातून पडकला हा दुर्मीळ प्राणी, शिजवून खाल्ला, कुत्र्यालाही खाऊ घातले, कुत्र्यासहीत 3 जणांचा मृत्यू, तज्ज्ञांनी सांगितलं नेमकं कारण
 
 
समुद्राच्या लाटांशी खेळणे हे त्यांचे दैनंदिन काम होते. मात्र, याच सवयीने त्यांना मृत्यूच्या दारात नेले. फिलिपिन्समधील मागुइन्दानाओ डेल नॉर्ट प्रांतातील समुद्रकिनारी वसलेल्या एका गावातील काही लोकांनी दुर्मीळ कासव पकडले, ते शिजवले आणि खाल्ले.

या कासवाचे मांस त्यांनी कुत्र्यांनाही खाऊ घातले. पण, त्यानंतर अनेकांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला. काहींना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान 3 जणांचा मृत्यू झाला. इतकंच नाही तर हे मांस खाल्लेले काही कुत्रे आणि मांजरीदेखील मृत्युमुखी पडले.

फिलिपिन्समध्ये या कासवाला दुर्मीळ प्रजातीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांना मारणे कायद्याने बेकायदेशीर आहे. तरीदेखील, स्थानिक संस्कृतीत कासव मारणे शुभ मानले जाते. कासव मारल्यानंतर समाजासाठी सामुदायिक मेजवानीचे आयोजन केले जाते. तसेच काही लोक कासवाच्या मांसामध्ये औषधी गुणधर्म असल्याचे मानतात. यामुळेही त्यांची बेकायदेशीर शिकार केली जाते. या प्रकरणात लोकांनी कायद्याचे उल्लंघन करत हे दुर्मिळ कासव पकडले आणि शिजवून खाल्ले. परंतु, आश्चर्य म्हणजे अनेक लोक कासवाचे मांस खातात आणि त्यांना काही होत नाही, मग फिलिपिन्समध्ये या व्यक्तींच्या मृत्यूचे कारण नेमके काय?
बीबीसीच्या अहवालानुसार, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की समुद्रातील कासवाच्या त्वचेवर विषारी शैवालांचे थर असतात. हे शिजवल्यानंतर या थरांमुळे विष तयार होते. समुद्रातील कासव 200 वर्षांपेक्षा जास्त काळ जगते. त्याच्या त्वचेला संरक्षण देण्यासाठी जैवरासायनिक पदार्थांचा एक थर असतो. बाह्य हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी हा थर शत्रूचा नाश करतो. शिवाय, समुद्री कासव बऱ्याचदा दूषित शैवाल खात असते, जे शिजवल्यानंतर चेलोनिटॉक्सिन नावाच्या विषात बदलते.

चेलोनिटॉक्सिन हे विष शरीरात गेल्यानंतर श्वासोच्छवास थांबवते. त्यामुळे काहींना लकवा होतो, तर काही जण अचानक मृत्युमुखी पडतात. हे विष लहान मुलांना अधिक घातक ठरते. तज्ज्ञांच्या मते, कासवाच्या शरीराच्या जवळपास सर्व भागांमध्ये हे विष असू शकते. आजतागायत या विषाचा प्रभाव नष्ट करणारे कोणतेही औषध शोधलेले नाही. यासाठी फक्त साधा उपचार केला जातो. मात्र, शरीराने विषाचा मुकाबला केला नाही, तर मृत्यू अटळ ठरतो. समुद्री कासवाचा उपभोग घेणे केवळ बेकायदेशीरच नाही, तर जीवघेणाही आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये सतर्क राहणे गरजेचे आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.