मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा निर्णय; या मुलांना देणार 2 लाख रुपये
देशातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि त्याच्या पत्नी नितेश अंबानी यांचे कुटुंब कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच लाईमलाईट मध्ये येत असते. मागील वर्षभरात अनंत अंबानी यांनी राधिका मर्चंट यांच्या लग्नामुळे अंबानी कुटुंब चर्चेत आले होते.
अनेकदा अंबानी कुटुंब सामाजिक कार्यासाठी देखील त्यांचे हात पुढे करत असतात. नीता आणि मुकेश अंबानी हे त्यांच्या रिलायन्स समूहाकडून सामाजिक कार्य देखील करत असतात.
नीता अंबानी या रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्या गरजू मुलांसाठी, महिलांसाठी त्याचप्रमाणे रुग्णांसाठी वेगवेगळ्या घटकांपर्यंत काम करत असतात. त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या उपक्रमांमधून अनेक लोकांना मदत केलेली आहे. यामध्ये रिलायन्स फाउंडेशनने शिष्यवृत्तीचा देखील समावेश केलेला आहे. आता जे हुशार विद्यार्थी आहेत, परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती नाही. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. यासाठी गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही शिष्यवृत्ती चालू केलेली आहे.
शिष्यवृत्ती अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे. आणि त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे. हा मुख्य उद्देश आहे. यासाठी उच्च शिक्षणासाठी मदत केली जाते. रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमोटर धीरूभाई अंबानी यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त रिलायन्स फाउंडेशन कडून 5 हजार पदवीधर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. 2024- 25 या वर्षासाठी जे विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे.
शिष्यवृत्तीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला दोन लाख रुपये दिले जातात. देशातील जवळपास एक लाखा पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेले आहेत. आता शिष्यवृत्तीसाठी अर्ज कोणत्या विद्यार्थी करू शकतात. हे आपण जाणून घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांच्या घरातील एकूण वार्षिक कमाई 15 लाखांपेक्षा कमी आहे.आणि जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये पदवीच्या पहिल्या वर्षात आहेत. ते लोक या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. कोणत्याही शाखेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येतो. या शिष्यवृत्तीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष कोठा राखीव ठेवण्यात आलेला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.