जगातला सगळ्यात श्रीमंत जावई! स्वागतासाठी सासऱ्याने खर्च केले 240 कोटी, जगाचे डोळे दिपले
मुंबई : सासरी गेल्यानंतर जावयासाठी पायघड्या घातल्याचं आणि त्याचे लाड केल्याची अनेक उदाहरणं आपण पाहत असतो, यात सासरची मंडळी श्रीमंत असतील तर काही विचारायचीच सोय नाही. तुम्हाला जगातल्या सगळ्यात श्रीमंत जावयाविषयी माहिती आहे का? ज्याच्या स्वागतासाठी सासऱ्याने कोट्यवधी रुपये खर्च केले. 20 वर्षांपूर्वी झालेल्या या लग्नाची चर्चा अजूनही होते.
जगातल्या सगळ्यात श्रीमंत जावयाचं नाव आहे अमित भाटिया. अमित भाटिया ब्रिटिश-इंडियन बिजनेसमन आहेत. अमित भाटिया कोट्यधीश स्टील व्यापारी लक्ष्मी निवास मित्तल यांचे जावई आहेत. स्वत: अमित भाटिया आयबे कॅपिटलचे फाऊंडर आणि एमडी आहेत. या संस्थेचं नाव आधी स्वोर्डफिश इनव्हेस्टमेंट होतं. अमित भाटिया यांचं सुरूवातीचं शिक्षण दिल्लीमध्ये झालं, यानंतर पुढच्या शिक्षणासाठी अमित भाटिया ब्रिटनला गेले.
अमित भाटिया यांच्याकडे कॉर्पोरेट फायनान्स आणि प्रायव्हेट इक्विटीमध्ये 20 वर्षांचा अनुभव आहे. 2004 साली त्यांचं लग्न वनिशा मित्तल यांच्यासोबत झालं. वनिशा मित्तल या लक्ष्मी निवास मित्तल यांच्या कन्या आहेत. 20 वर्षांपूर्वी झालेल्या या लग्नात 240 कोटी रुपये खर्च झाला होता. 2 दशकांपूर्वी झालेलं हे लग्न अजूनही सगळ्यात महागड्या लग्नांपैकी एक आहे.
6 दिवस चाललं लग्न
लक्ष्मी निवास मित्तल यांना त्यांच्या मुलीचं लग्न शाही आणि ऐतिहासिक करायचं होतं, यासाठी त्यांनी कोणतीही कसर ठेवली नाही. मुलगी वनिशाच्या विदाईचा भव्यदिव्य कार्यक्रम त्यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ठेवला होता. तब्बल 6 दिवस हे लग्न फ्रान्समध्ये चाललं. जगभरातून तब्बल 10 हजार पाहुणे या लग्नात सहभागी झाले होते. शाहरुख खानसह बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना या लग्नात परफॉर्म केलं होतं. अमेरिकन सिंगर काइली मिनॉगने या लग्नात परफॉर्म करण्यासाठी 1 कोटी रुपये घेतले. तर शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांनीही अन्य कलाकारांसोबत लग्नात परफॉर्म केलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.