Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'तिने मला लिव्हर दिलं आणि स्वत: निघून गेली', पुष्पा 2च्या चेंगराचेंगरीत मृत महिलेच्या पतीची ह्रदयद्रावक कहाणी

'तिने मला लिव्हर दिलं आणि स्वत: निघून गेली', पुष्पा 2च्या चेंगराचेंगरीत मृत महिलेच्या पतीची ह्रदयद्रावक कहाणी
 

मुंबई : अभिनेता अल्लू अर्जूनचा ‘पुष्पा 2’ हा सिनेमा रिलीज झाला. रिलीजआधीच्या प्रीमियरमुळे सिनेमाला गालबोट लागलं. प्रीमियरला अल्लू अर्जूनने हजेरी लावली. त्याला पाहण्यासाठी हैद्राबादमधील थिएटर बाहेर प्रेक्षकांची गर्दी जमली. अल्लू अर्जून प्रीमियरला पोहोचला तेव्हा उत्साही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. थिएटरच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली. या गर्दीत एका महिलेचा मृत्यू झाला. रेवती असं मृत महिलेचं नाव आहे. महिलेच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या महिलेच्या पतीला दुःख अनावर झालं. त्याने आपल्या पत्नीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्या महिलेची इनसाइड स्टोरी समोर आली आहे. तसंच प्रीमियरच्या संध्याकाळी नेमकं काय झालं हे देखील त्याने सांगितलं.

 

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रेवती आणि मोगादमपल्ली भास्कर हे आपल्या मुलांबरोबर ‘पुष्पा 2’ पाहण्यासाठी हैद्राबाद येथील संध्या थिएटरला गेले होते. दोघेही ‘पुष्पा’ फॅन होते. रेवती हिने तिच्या पतीला तिची एक यकृत दान केल्याचा खुलासा त्याने केला. “तिने मला जीवनदान दिलं आणि ती स्वतः निघून गेली” अशा शब्दात त्याने दुःख व्यक्त केलं.

2023 मध्ये रेवतीने तिच्या नवऱ्याला तिची एक यकृत दान केली होती. ती एका यकृतावर आयुष्य जगत होती. महिलेच्या नवऱ्याने सांगितलं, “त्यांचा मुलगा श्रीतेज आणि छोटी मुलगी सान्वी यांनी ‘पुष्पा 2’ पाहायला जाण्याचा हट्ट धरला. आम्ही मुलांना घेऊन ‘पुष्पा 2’ पाहण्यासाठी संध्या थिएटरला पोहोचले पण तिथे अल्लू अर्जूनला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. चौघे त्या गर्दीत अडकलो. रेवती मुलगा श्रीतेजबरोबर होती. दोघेही त्या गर्दीत अडकले. मी पहिल्यांदा मुलगी सान्वीला गर्दीतून दूर केलं. कारण ती चेंगराचेंगरीत रडू लागली.”

महिलेच्या नवऱ्याने सांगितलं, “गर्दी पाहून मी सान्वीला बाजूच्या गल्लीत असलेल्या माझ्या सासरच्या घरी सोडण्याचा निर्णय घेतला. मी तिला घेऊन गेलो आणि परत आलो तेव्हा रेवती आणि श्रीतेज तिथे नव्हते जिथे मी त्यांना सोडून गेलो होतो. त्याआधी रेवती मला म्हणाली की आम्ही थिएटरच्या आत आहोत. ते आमचं शेवटचं बोलणं होतं.”

त्यांनी पुढे सांगितलं, “गर्दीला कंट्रोल करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. ज्यात रेवती आणि माझा मुलगा गंभीररित्या जखमी झाले. मला आठवतंय की मला कोणीतरी व्हिडिओ दाखवला ज्यात मुलगा श्रीतेज रेवतीच्या कुशीत होता. त्यांना नंतर एका गाडीतून नेण्यात आलं जी चिक्कडपल्ली पोलीस स्टेशनला थांबली होती. तिथून त्यांना KIMS रुग्णालयात नेलं. गुरुवारी सकाळी 2.30 वाजेपर्यंत मला रेवतीची काहीच अपडेट मिळाली नाही. नंतर एका पोलीस अधिकाऱ्याने मला सांगितलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली.”


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.