Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधून आठ लाखांच्या ऑक्सिजनच्या पाईप चोरीस :, बोंदोबस्तासाठी असणाऱ्या सुरक्षा रक्षकासाठी महिन्याला 18 लाखांचा खर्च

सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधून आठ लाखांच्या ऑक्सिजनच्या पाईप चोरीस :, बोंदोबस्तासाठी असणाऱ्या सुरक्षा रक्षकासाठी महिन्याला 18 लाखांचा खर्च 


सांगली : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातून आठ लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या ऑक्सिजन पाईप चोरट्यांनी लंपास केल्या. हा प्रकार वर्षभरापासून सुरू होता. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता शिवाजी गवळी (वय ४४, रा. वंटमोरे कॉर्नर, मिरज) यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
सिव्हिल रुग्णालयातील १०० बेडस् इमारतीचे नूतनीकरण करण्यात येत आहे. या इमारतीमधील जुना वॉर्ड ४६, ४७, ४८, ४९, ६२, ६३,६४, ६५ मधील २२ एमएम व १५ एमएम व्यासाची तांब्याची १५०० मीटर लांबीची ऑक्सिजन पाईप व इतर साहित्य चोरट्यांनी लंपास केले. चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने पोलिसांत तक्रार दिली.

"शासकीय रुग्णालयात नेहमीच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी असते. शिवाय प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकही तैनात असतात. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. सिव्हिलमध्ये पोलिस चौकीही आहे. तरीही चोरीची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तब्बल एक वर्षापासून चोरटे ऑक्सिजन पाईप चोरून नेत असताना, सिव्हिल प्रशासन झोपेत होते का? असा प्रश्न पडला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.