Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

13 हजार पगार असलेल्या आरोपीने मैत्रिणीला गिफ्ट केला फोर बीएचके फ्लॅट; बीएमडब्ल्यू कारही केली खरेदी, संभाजीनगरमधील प्रकार

13 हजार पगार असलेल्या आरोपीने मैत्रिणीला गिफ्ट केला फोर बीएचके फ्लॅट; बीएमडब्ल्यू कारही केली खरेदी, संभाजीनगरमधील प्रकार
 

छत्रपती संभाजीनगरः छत्रपती संभाजीनगर क्रीडा अपहार प्रकरणामधील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 13 हजार रुपये पगार असणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला 21 कोटी 59 लाख 38 हजार रुपयांचा गंडा घातला. या पैशातून आरोपीने बीएमडब्ल्यू कार, बीएमडब्ल्यू बाइक खरेदी केली, तर मैत्रिणीसाठी विमानतळासमोरील अपार्टमेंटमध्ये 4 बीएचके फ्लॅट विकत घेतला आहे.

 

छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलात 21 कोटी 59 लाख 38 हजार 287 रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बँक खात्यातील ही रक्कम दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वतःच्या खात्यांत वळती करून हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात आता आता विविध प्रकार समोर येत आहे. संबंधित आरोपीने शहरातील नामांकित ज्वेलर्समध्ये डायमंडचा चष्माही बनवायची ऑर्डर दिली होती, तर दुसऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीने 35 लाखांची एसयूव्ही कार खरेदी केली आहे, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे, हर्षकुमार अनिल क्षीरसागर (रा. बीड बायपास) असे मुख्य आरोपीचे नाव असून तो एसयूव्ही कार घेऊन फरार झाला आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणातील मुख्य आरोपी क्षीरसागर याने क्रीडा उपसंचालकांच्या नावाचा आणि स्वाक्षरीचा बनावट वापर केला. त्याने बँकेला बनावट मजकुराचे पत्र पाठवून बँक खात्याला स्वतःचा मोबाइल क्रमांक जोडला. मोबाईल नंबर जोडल्यानंतर नेट बँकिंगची सुविधा सुरू करून खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे स्वतःच्या खात्यात ट्रान्स्फर केले. हा संपूर्ण प्रकार होत असताना क्रीडा उपसंचालक आणि बँकेतील अधिकाऱ्यांना याची जाणीव कशी झाली नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. इतक्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारानंतरही क्रीडा संकुलाच्या उपसंचालकांना किंवा बँकेतील जबाबदार अधिकाऱ्यांना याचा पत्ता कसा लागला नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 

तसेच, आयकर विभागाकडूनही कोणतीही नोटीस न आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून आणखी माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घोटाळ्यात इतर कोणी सहभागी आहेत का, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. सरकारी निधीवर असे दुरुपयोग होणे ही गंभीर बाब असून, दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.