Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुमच्या फोनची A टू Z माहिती काढून घेतात हे app, तुम्ही तर वापरत नाही ना?

तुमच्या फोनची A टू Z माहिती काढून घेतात हे app, तुम्ही तर वापरत नाही ना?
 

मुंबई: स्मार्टफोन युझर्सची संख्या आता कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये सोशल मीडियासह रोजच्या वापरासाठी अनेक अ‍ॅप्स डाउनलोड केलेली असतात. याशिवाय आपल्यापैकी बहुतांश युझर्सच्या स्मार्टफोनमध्ये एक अ‍ॅप खास डाउनलोड केलेलं असते.आपल्याला अनोळखी व्यक्तीचा कॉल आला तर त्याबाबत माहिती देण्याचं काम हे अ‍ॅप करतं; पण हे अ‍ॅप तुमच्या स्मार्टफोनमधली सगळी माहिती जमा करते.

रोजच्या वापरासाठी अनेक अ‍ॅप्स आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड केलेली असतात. यात काही अ‍ॅप्स किराणा माल, भाजीपाला किंवा इतर वस्तू खरेदीसाठीची असतात, तर काही सोशल मीडिया अ‍ॅप्स असतात. या अ‍ॅप्सच्या यादीत एक असं अ‍ॅप असतं, की जे तुमच्या स्मार्टफोनमधली सर्व माहिती जमा करतं. यात तुमचे मेसेज, लोकेशन आणि कॉन्टॅक्ट लिस्टचा समावेश असतो. ट्रूकॉलर असं त्याचं नाव असून, हे अ‍ॅप आता जवळपास सर्वच युझर्स वापरतात.

 

ट्रूकॉलर हे स्वीडनमधल्या ट्रू सॉफ्टवेअर स्कॅन्डेनोव्हिया एबी या कंपनीचं अ‍ॅप आहे. कॉलविषयी माहिती देण्याकरिता कंपनीने सोशल मीडिया अ‍ॅपशी टायअप केलं आहे. जर तुम्ही एखाद्या सोशल मीडिया अकाउंटवर तुमचा फोन क्रमांक टाकला, तर त्याची माहिती ट्रूकॉलरकडे जाते. याशिवाय एपीआय आणि एसडीके हे वेगवेगळे कम्प्युटर प्रोग्राम असून, याच्या मदतीने ट्रूकॉलर फोन क्रमांक ओळखतो.

ट्रूकॉलरचा वापर अनोळखी कॉलच्या माहितीसाठी सर्वाधिक प्रमाणात केला जातो. जर तुम्हाला अनोळखी व्यक्तीचा कॉल येत असेल आणि त्याचा फोन क्रमांक स्मार्टफोनमध्ये सेव्ह नसेल तर ट्रुकॉलरच्या मदतीने स्मार्टफोन युझर कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नाव जाणून घेऊ शकतो.

 

ट्रूकॉलर इन्स्टॉल करताना हे अ‍ॅप मेसेज, कॉल डिटेल, कॉन्टॅक्ट लिस्ट अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी मागतं. जर तुम्ही ही परवानगी दिली तर अगदी तुमच्या बँकिंग तपशीलापासून ते कॉन्टॅक्ट लिस्टपर्यंतची सर्व माहिती ट्रूकॉलरकडे जाते. यामुळे तुमची प्रायव्हसी धोक्यात येते. ही माहिती थर्ड पार्टीला विकण्याचा धोका वाढतो. त्यामुळे कोणतंही अ‍ॅप इन्स्टॉल करताना मागितलेली परवानगी काळजीपूर्वक वाचा, अन्यथा तुमची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.