वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने नुकतीच काही अस्वास्थ्यकर अर्थात अनहेल्दी पदार्थांची यादी जाहीर केली आहे, जे नियमितपणे खाल्ल्यास शरीरात आजार होऊ शकतात.
यामध्ये प्रामुख्याने लठ्ठपणा, हृदयविकार, कर्करोग आणि मधुमेह यांचा समावेश होतो. अशा परिस्थितीत, निरोगी जीवनशैली राखण्यासाठी आपण आपल्या आहारात अतिशय काळजीपूर्वक पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. म्हणूनच, या लेखात आम्ही तुम्हाला अशा 6 अनहेल्दी पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे न खाण्याचा किंवा अगदी कमी प्रमाणात न खाण्याचा सल्ला WHO नेदेखील दिला आहे.
कोणते आहेत हे पदार्थ जाणून घ्या
प्रोसेस्ड मीट
प्रोसेस्ड मीटमधून होतोय त्रास सॉसेज, हॅम आणि खारवून वाळवलेले डुकराचे मांस यांसारख्या प्रक्रिया केलेले मांस अर्थात प्रोसेस्ड मीट, सोडियमचे प्रमाण जास्त असते आणि ते रसायनांसह दीर्घ काळासाठी साठवले जाते. या पदार्थांच्या अतिसेवनाने कर्करोगाचा, विशेषतः कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे प्रोसेस्ड मीट खाणे सहसा टाळावे असा सल्ला WHO ने दिलाय.
शुगर मिक्स्ड ड्रिंक्ससाखर मिश्रित थंड पेयेसोडा आणि एनर्जी ड्रिंक्ससारख्या साखर मिश्रित पेयांमध्ये भरपूर कॅलरीज असतात. तुम्ही सतत असे ड्रिंक्स पित असाल अथवा साखर असणारे कोणते ड्रिंक्स असतील आणि त्याचे अतिसेवन करत असाल तर वजन वाढण्यास आणि टाइप 2 मधुमेहास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे डब्ल्यूएचओ त्याऐवजी पाणी आणि ताज्या फळांचा रस वापरण्याची शिफारस करतो. नियमित तुम्ही नैसर्गिक साखर असणारे ज्युस पिण्याचा सल्ला WHO ने दिला आहेट्रान्सफॅट्स पदार्थसतत बाहेरचे खाणे आणि फॅट्सयुक्त खाणेपॅक केलेले स्नॅक्स, फास्ट फूड आणि मार्जरीन यांसारखे ट्रान्स फॅट असलेले पदार्थ हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. ते शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतात आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात. त्यामुळे असे ट्रान्सफॅट्स असणारे पदार्थ तुम्ही खाणे टाळावे अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो वा अत्यंत कमी प्रमाणात या पदार्थांचे सेवन करावेमीठमिठाचे अतिसेवनही ठरेल त्रासदायकआयोडीनसाठी मिठाचे सेवन आवश्यक आहे, परंतु जर तुम्ही WHO ने अभ्यासात सांगितल्याप्रमाणे दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त खाल्ले तर ते तुमचे आरोग्य बिघडू शकते. दरम्यान तुम्ही चिप्स, पॅकेज्ड अन्न आणि फास्ट फूडचा वापर कमीत कमी केला पाहिजे. कारण यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. विशेषतः लहान मुलांना या खाण्यापासून तुम्ही दूर ठेवावेसफेद ब्रेड आणि रिफाईंड धान्यब्रेड खाणे टाळावेपास्ता आणि तांदूळ यांसारखे व्हाईट ब्रेड आणि रिफाईंड धान्ये फायबरच्या कमतरतेमुळे शरीराला पोषण देत नाहीत. त्यात साखर आणि कॅलरीज जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे लठ्ठपणा आणि त्यामुळे होणारे आजार होऊ शकतात. व्हाईट ब्रेड खाणे हे शरीरासाठी अत्यंत वाईट ठरते असेही अनेक अभ्यासात सांगण्यात आले आहे.
टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.