नवरा-बायकोचं नातं हे पवित्र नातं मानलं जातं; पण काही जण लग्नानंतरही परस्त्रीबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवतात. अनेकदा अशा विवाहबाह्य संबंधांमुळे नात्यात दरी निर्माण होतेच; शिवाय समाजात नाचक्कीदेखील होते. अनेकदा विवाहबाह्य संबंध सर्वांसमोर उघड होतात. अशा वेळी लोकांना तोंड दाखविण्यासाठी जागा राहत नाही. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यात एका सरपंचाला त्याच्या पत्नी कारमधून गर्लफ्रेंडबरोबर जाताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्या गर्लफ्रेंडची भररस्त्यात बायकोने अशी अवस्था केली की, तिला पुन्हा लोकांना तोंड दाखविण्यासाठी जागा ठेवली नाही.
ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती मिळाली आहे. व्हिडीओमध्ये कारमध्ये सरपंच नवरा आणि त्याची गर्लफ्रेंड बसले होते. दोघेही लाँग ड्राईव्हसाठी निघाले होते, इतक्यात समोरून सरपंचाची बायको आली आणि तिनं कारमध्येच दोघांना रंगेहाथ पकडले. दोघांना एकत्र पाहून संतापलेल्या बायकोनं कारचा दरवाजा उघडला आणि गर्लफ्रेंडची चांगलीच धुलाई करायला सुरुवात केली. यावेळी तिचा सरपंच नवरा मात्र लाजेनं मान टाकून बसला होता. त्याच्यावर तोंड लपवण्याची वेळ आली होती. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
सरपंच नवऱ्याला गर्लफ्रेंडबरोबर रंगेहाथ पकडलं
त्याचं झालं असं की, नीमचित जिल्ह्याच्या सरपंचाचे दुसऱ्या महिलेबरोबर म्हणजे एका अंगणवाडी सेविकेबरोबर विवाहबाह्य संबंध सुरू असल्याचा संशय त्याच्या बायकोला होता. त्यामुळे तिनं नवरा कुठे जातो, कोणाला भेटतो यावर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. एक दिवस सरपंच गर्लफ्रेंडबरोबर एका हॉटेलमधून बाहेर निघाला. त्यानंतर कारमध्ये बसून दोघे लाँग ड्राईव्हसाठी निघत होते. इतक्यात भररस्त्यात बायकोनं दोघांना रंगेहाथ पकडले. तिनं रस्त्यातच सरपंच नवऱ्यासह त्याच्या गर्लफ्रेंडला शिवीगाळ केली, यानंतर तिला केसांना पकडून मारहाण सुरू केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.