महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. त्याचवेळी तिकीट दिले नाही म्हणून पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा अचानक गायब झाले होते.
याचदरम्यान आता पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि शिंदे गटाचे प्रकाश निकम देखील नॉट रिचेबल झाले आहेत. पालघर जिल्ह्यातील बोईसर, पालघर आणि आता विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून विरोधी उमेदवारी दाखल केलेले पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम हे देखील कालपासून नॉट रिचेबल झाले आहेत. तसेच नाशिक जिल्ह्यातील 2 उमेदवार नॉट रिचेबल झाले आहेच. एकंदरित आज (4 नोव्हेंबर) राज्यातील आणखी तीन उमेदवार नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नाराज उमेदवारांनी बंडाचा झेंडा फडकावत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. महायुतीला बंडाचे ग्रहण लागल्याचे बोललं जात आहे. बंडाळी शमविण्यासाठी आणि मोडीत काढण्यासाठी वरिष्ठांचे प्रयत्न सुरु आहेत.
पालघरमधील दोन्ही मतदारसंघातील बंडखोर उमेदवार नॉट रिचेब असताना आता विक्रमगड मतदारसंघातील विरोधी पक्षाचे उमेदवार आणि पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम हेही नॉट रिचेबल झाले आहेत. यामुळे पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज (4 नोव्हेंबर) दिवस असल्याने अधिकृत उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
दुसरीकडे शिंदे यांचे दिंडोरी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धनराज महाले आणि देवळाली मतदारसंघातील राजश्री अहिरराव हे उमेदवार नॉट रिचेबल झाले आहेत.दोघांनाही अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विमानाने एबी फॉर्म पाठवलेले होते. मात्र आता या दोन्ही उमेदवारांना महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश आल्यानंतर दोन्ही उमेदवार नॉट रिचेबल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन्ही उमेदवारांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. मात्र दोन्ही उमेदवार नॉटरिचेब झाल्याने शिंदे यांच्या शिवसेनेसह महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. नाशिकच्या देवळाली आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने अजित पवार यांच्या उमेदवारीविरोधात उमेदवार उभे केले होते. या दोन्ही उमेदवारांच्या सांगण्यावरून मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.उदगीरमधून भाजपचे विश्वजित गायकवाड इच्छुक होते. केवळ उदगीरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. विश्वजीत गायकवाड यांनी उमेदवारी दाखल करून तगडे आव्हान उभे केले होते. मात्र देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर विश्वजित गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली. पत्रकार परिषदेत विश्वजीत गायकवाडय यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. उदगीर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उमेदवार संजय बनसोडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार सुधाकर भालेराव अशी लढत आता पाहायला मिळणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.