नागपूर : आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदानासाठी मोठी तयारी केली आहे. याचदरम्यान, दुसरीकडे नागपुरातून मोठी बातमी हाती आली आहे.
नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. काटोल येथील तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येताना जलालखेडा रोडवरील बेलफाट्यावजवळ काही व्यक्तीने त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत जीवघेणा हल्ला झाला आहे. यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.