सांगली जिल्ह्यातील कडेगाव नगरपंचायतीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
कडेगाव नगरपंचायत, सांगली येथे शहर समन्वयक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कडेगाव (सांगली) येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, नगर पंचायत कडेगाव, जि. सांगली येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://sangli.nic.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : शहर समन्वयक.– रिक्त पदे : 01 पदे.– मानधन/पगार : 45 हजार-प्रतिमहा.– वयोमर्यादा : कमाल वयोमर्यादा 35 वर्षे.– नोकरीचे ठिकाण : कडेगाव, जि. सांगली.– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 डिसेंबर 2024.– अर्ज पाठवण्याचा पत्ता : नगर पंचायत कडेगाव, जि. सांगली
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.