परभणी: आई वडील अन् मुलीने एकत्रितपणे ट्रेनखाली आयुष्य संपवल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना परभणीमध्ये घडली आहे. या भयंकर घटनेने एकच खळबळ उडाली असून शिक्षक कुटुंबाच्या या धक्कादायक निर्णयाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. परभणीच्या धारखेड परिसरातील रेल्वे लाईनवर ही घटना घडली असून पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, परभणी शहरातील ममता विद्यालयातील माध्यमिक विभागात कार्यरत आसलेले मसनाजी सुभाषराव तुडमे शिक्षक कुंटुबाने गुरूवारी (ता. 28 नोव्हेंबर) दुपारी तीनच्या सुमारास एकत्रित आत्महत्या केली. या भयंकर घटनेने परभणी जिल्हा हादरुन केला आहे. शिक्षक मसनाजी सुभास तुडमे (वय 45) पत्नी रंजना तुडमे (वय 40) मुलगी अंजली तुडमे( वय 21) अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत
अहमपुर जवळील गावात आसलेले मसनाजी तुडमे हे शहरातील ममता विद्यालयातील माध्यमिक विभागात शिक्षक पदी कार्यरत होते. आज दुपारच्या सुमारास ते पत्नी आणि मुलीसह गोदावरी पुल धारखेड परिसरातील रेल्वे लाईनवर आले. त्यानंतर परभणीकडून परळीकडे जाणारी मालगाडी येत आसल्याचे दिसताच तिघेही पटरीवर झोपले. भरधाव ट्रेन अंगावरुन केल्याने तिघांचाही जागीच अंत झाला.ही घटना इतकी भयंकर होती की तिघांचेही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडले होते. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी होती. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरु आहे. उच्चशिक्षित शिक्षक कुटुंबाने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला? असा सवाल आता उपस्थित होत असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.