महिला अपक्ष उमेदवार श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी भल्या पहाटे
नागरिकांशी साधला संवाद......! अडचणी सोडवण्याची दिली ग्वाही ; स्टॉलवर
रंगली चाय पेय चर्चा
सांगली, ता.७: सांगली विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष महिला उमेदवार श्रीमती.जयश्रीताई मदन पाटील यांनी शहरातील विविध भागात पहाटेच्या सुमारास मॉर्निंगवॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, प्रश्न जाणून घेत विविध विषयांवर चर्चा केली. नागरिकांशी साधलेल्या संपर्क मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळाला असून जयश्री वहिनींना विजयासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
येथील आमराई उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण, महावीर उद्यान बापट मळा यासह आप्पासाहेब बिरनाळे फार्मसी कॉलेज आदी भागात मॉर्निंग वॉक करताना नागरिकांशी त्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली व त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
सांगली शहरासह विकासाबाबतच्या मतदारांच्या कल्पनाही त्यांनी जाणून घेतल्या. तसेच लोकांच्या असलेल्या अपेक्षाही त्यांनी समजून घेतल्या.मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्यासमोर समस्यांचा पाढाच वाचला. तत्कालीन सांगली जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या विष्णू अण्णां, मदन भाऊ यांच्या काळात जे काम झालेले आहे त्या व्यतिरिक्त विद्यमान आमदारांनी एक रुपयाचा ही निधी दिलेला नाही असे नागरिकांनी सांगितले.
शहरातील क्रीडांगणासह सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची उभारणी करावी, तसेच क्रीडांगणावर भरतीसाठी येणाऱ्या महिलांच्या साहित्यांसाठी लॉकरची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. जयश्री ताईंनी या सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.त्यानंतर जयश्री ताईनी छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर असलेल्या चहा, नाश्ता सेंटरवर असलेल्या नागरिकांशी त्यांनी संपर्क साधत मनमुराद गप्पा मारून आपणास पाठिंबा देण्याची विनंती केली. यावेळी सिकंदर जमादार सर,अजित सूर्यवंशी,विशाल पडोळकर, केतन आवटी,जयराज बर्गे,उत्तम साखळकर उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.