Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपने गाडगीळाच्यावर उमेदवारी लादली.....!माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील ; सांगलीत पाकीजा मस्जिद समोर जयश्री पाटलांची सभा

भाजपने गाडगीळाच्यावर उमेदवारी लादली.....! माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील ; सांगलीत पाकीजा मस्जिद समोर जयश्री पाटलांची सभा 


सांगली, ता.१७: आमदारांनी गेल्या दहा वर्षात विधानसभेत तोंड सुद्धा उघडलं नाही.मी उभारणार नाही असं जाहीर करून सुद्धा पक्षाने गाडगीळ यांच्यावर जबरदस्तीने उमेदवारी लादली. यांना स्वतः निवडून यायची शाश्वती नाही ? तो माणूस आज विधानसभेसाठी उभा आहे. पक्षाने त्यांना उभे केले आहे त्यामुळे यांना निवडणुकीसाठी उभाच राहायचं नव्हतं त्यांना आपण कसे निवडून देऊ शकतो असा घनाघनाती टोला माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी अपक्ष महिला उमेदवार जयश्री पाटील यांच्या सभेत दिला.
           
सांगलीतील शंभर फुटी रस्त्यावरील पाकीजा मज्जिद समोर जयश्री पाटील याची जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर पूजा पाटील,सोनिया होळकर-पाटील,सत्यजित पाटील,संग्राम पाटील,माजी नगरसेवक फिरोज पठाण, आयुब पठाण, युनूस महात, निरंजन आवटी, माजी महापौर किशोर शहा, कय्युम पटवेगार, सिकंदर जमादार, मुस्ताकभाई खाटीक, आरपीआयचे किरण कांबळे, महावीर कागवाडे, वंचित चे नितीन सोनवणे, अँड.शहजाब नायकवडी , संतोष पाटील, शितल लोंढे, शमीकांत आवटी यासह आदी मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी पुढे प्रतीक पाटील म्हणाले,आमची विचारसरणी काँग्रेसची आहे, ही लढाई काँग्रेस विरोधी नाही. भाजपला हरवण्यासाठी आमची उमेदवारी आहे. त्यामुळे आमच्यासाठी मुस्लिम समाजाचे मतदान महत्त्वाचे आहे. जयश्री पाटील हे इतिहासाचे साक्षीदार आहेत. गाडगीळानी विधानसभेत विकासाच्या मुद्द्यावर कोणता वेगळा मुद्दा मांडला का ? त्यांच्याच पक्षातले त्यांचेच नगरसेवक, कार्यकर्ते यांची नाराजगी का आहे ? ज्याला तुमच्या अडचणीची जान नाही तो तुमचा उमेदवार नाही. त्यामुळे आम्ही महिला उमेदवार उभी केले आहे. त्यामुळे सांगलीत महिला पॅटर्न राबवूया. 
    
जयश्री पाटील म्हणाले, विरोधी उमेदवाराकडून जयश्री पाटील पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु, मी मदन पाटील यांची बायको आहे, मदन पाटील एक लढवय्या नेता होता. त्यामुळे लढत्या रणांगणातून मी कधीही माघार घेणार नाही. माझी उमेदवारी तुमच्या सर्वांची आहे. मदन भाऊ की जोरो खडी रहेंगी, तो हम उसको साथ देंगे, अभी और टाईम आ गया है असा खणखणी डायलॉग जयश्री पाटील यांनी मारला. निरंजन आवटी म्हणाले, अल्पसंख्याकांना न्याय देण्याचे काम मदन भाऊंनी केले. सांगलीत एका महिलेला संधी दिली पाहिजे. मदन भाऊंनी गरिबांना नगरसेवक केलं तर कुणाला सभापती केलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.