राजस्थानला भारतातील सांस्कृतिक वारसा आणि ऐकिहासिक वारसा जपणारे गाव म्हणून ओळखले जाते. हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. राजस्थानमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक दूरवरून भेट देण्यासाठी येतात. येथील सौंदर्य आणि ऐतिहासिक ठिकाणे
लोकांना भुरळ घालतात. ही ठिकाणे जगभरात प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहित
आहे का, या ठिकाणी एक असे रहस्यमयी गाव आहे जिथे एका रात्रीत सगळे लोक गायब
झाले. ऐकून विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे.
एका रात्रीत गायब झाले लोक कारण
तर राजस्थानच्या जैलसमेर जिल्ह्यातील कुलधारा गावची एक अनोखी आणि रहस्यमयी कथा आहे. एक असे गाव आहे जे रात्रीत एका रात्रीत गायब झाले होते. एका कथेनुसार, एकेकाळी पालीवाल ब्राह्मणांनी वसलेल्या या गावामध्ये पाच हजारांहून अधिक लोक राहत होते. मात्र आज या गावातील घरे उजाड आणि पडझड झाली आहेत. या गावात एकही मनुष्य तुम्हाला पाहायला मिळणार नाही. या गावात अनेक वर्षांपासून भुताटकीचा वास असल्याचे येथील आसपासचे लोक सांगतात. यामुळे आजही लोक या ठिकाणी जाण्यास घाबरतात.
निर्दयी दिवाण
असे मानले जाते की, राजस्थानमधील कुलधारा गावात सलीम सिंग नावाचा एक अत्यंत निर्दयी दिवाण होता. त्याच्या क्रूर कृत्यांनी गावकऱ्यांचे जीवन त्रासदायक बनले होते. एकदा या सलीम सिंगने प्रधानाच्या मुलीला त्रास दिला होता. तसेच त्याने तिच्याशी लग्न करायचे ठरवले होते. मात्र, प्रधानाने त्याला नकार दिला. परंतु सलीमने तिचे उपहरण केले. या घटनांमुळे गावातील लोकांना राग आला आणि त्यांनी प्रधानासोबत बैठक घेऊन सर्वांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला.
शाप
त्याच वेळी गाव सोडताना, त्या गावातील एका ब्राह्मणांच्या एका प्रमुखाने सलीम सिगंला शाप दिला. याशापानुसार, सलीम कधीही गावामध्ये राहू शकणार नाही. त्यानंतर गावातील सर्व लोक तिथून निघून गेले. त्यानंतर कधीच परत आले नाहीत. या घटनेमुळे कुलधारा गाव शापित ठिकाण बनले. या ठिकाणी आजही राजस्थानमधील लोक जाण्याचे, राहण्याचे धाडस करत नाहीत. गाव सोडताना, ब्राह्मणांच्या एका प्रमुखाने सलीम सिंगला शाप दिला. शापानुसार, सलीम कधीही या गावात स्थायिक होऊ शकणार नाही. गावातील लोक एकाच रात्री भूतकाळाकडे निघून गेले आणि त्यानंतर कधीच परत आले नाहीत. या घटनेमुळे कुलधारा गाव शापित ठिकाण बनले, जिथे आजही कोणतीही व्यक्ती राहण्यासाठी धाडस करत नाही.
कुलधारा भारतीय संस्कृतीत एक अनोखी ओळख
राजस्थानचे कुलधारा हे गाव आज केवळ खंडित घरे आणि अवशेषांचे गूढ शिल्प बनलेले आहे. गावाची शांतता आणि अंधाराची छाया लोकांना भयभीत करून सोडते. अनेक पर्यटक या गावाला भेट देतात. मात्र या गावात नंतर कोणाही थांबत नाही. आसपासच्या गावातील लोकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, येथे काहीतरी अदृश्य आणि भयावह आहे असे त्यांना वाटते. कुलधारा गावाच्या या कथेमुळे, ही जागा एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक धरोहर बनली आहे. आजही या गावाच्या कथा आणि शाप यामुळे लोकांच्या मनात एक गूढता आहे. यामुळे कुलधारा भारतीय संस्कृतीत एक अनोखी ओळख बनले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.