पोलीस कर्मचाऱ्याची स्वतः गोळी घालून केली आत्महत्
पोलीसाची ड्युटी करतांना तणावात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या एसएलआर रायफने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. राकेश पांडुरंग भांडारकर (३७, रा. पदमपूर ता. आमगाव जि. गोंदिया) असे गोळी झाडून आत्महत्या करणाऱ्या पोलीस शिपायाचे नाव आहे.
गोंदिया पोलीस दलात कार्यरत पोलीस शिपाई राकेश आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून बिरसी विमानतळावर कार्यरत असलेल्या राकेश भांडारकर यांची ड्यूटी बिरसी विमानतळावर शांततेत सुरू होती, १७ नोव्हेंबर रोजी पाईटवर ड्युटी करतांना त्याला त्याचे तेथील अधिकारी व काही सहकारी त्याला मानसिक त्रास देत होते. पाईटवर ड्युटी असतांना त्याला इकडे-तिकडे पाठवित होते. त्याला वारवार मानसिक त्रास देत असल्याने तणावात आलेल्या राकेश भांडारकर याने स्वतः जवळील असलेली एसएलआर रायफने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
राकेश भांडारकर यांची बहिणी अरूणा भांडारकर ही देखील गोंदिया पोलीस दलात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. राकेशने दुपारी २:४८ वाजता आपल्या बहिणीच्या मोबाईलवर एक मॅसेज टाकला. रिजर्व लोक असतांना मला पाईट वरून बोलावत आहेत. माझ्या मरणाला कारणीभूत हे तीन लोक आहेत असा मॅसेज टाकून त्या मॅसेजमध्ये एका पीएसआयसह तिघांचे नाव टाकण्यात आले आहेत. आपल्या कामात व्यस्त असलेल्या अरूणा भांडारकर यांनी मोबाईलला हात न लावल्यामुळे त्यांना भावाचा मॅसेज मिळाला नाही. सायंकाळ होताच त्यांच्या मोबाईलवर फोन आल्यानंतरच राकेशच्या मृत्यूची बातमी कळाली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.