शिरगुप्पी : कागवाड तालुक्यातील फरीदखानवाडी येथे जन्मदात्या आईनेच तीन वर्षाच्या कोवळ्या बालकाचा चाकूने भोसकून खून केला. त्यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी घडली.
सात्विक राहुल कटगेरी असे खून झालेल्या निष्पाप बालकाचे नाव आहे. कौटुंबिक वादातून भाग्यश्री राहुल कटगेरी या मातेने हे कृत्य केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
अधिक माहिती अशी, फरीद खानवाडी येथील राहुल मारुती कटगिरी याचा सात वर्षांपूर्वी भाग्यश्री हिच्याशी विवाह झाला होता. त्यांना तीन वर्षाचा सात्विक हा मुलगा होता. राहुल व भाग्यश्री या पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून सतत भांडणे होत होती. शनिवारी भांडणाच्या रागातून भाग्यश्री हीने रागाच्या भरात चाकूने सात्विक याच्यावर वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोक जमा झाले. त्यांनी भाग्यश्रीला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. लोकांनी तिला ताब्यात घेतले.
त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक आर. एस. बसर्गी, उपाधीक्षक प्रशांत मुंडोळी, मंडल पोलिस निरीक्षक संतोष हळू, कागवाडचे उपनिरीक्षक जी. जी. बिराजदार, कागवाडचे सीडीपीओ संजीव कुमार सदलगे यांनी घटनास्थळी भेट दिली. भाग्यश्रीचा पती राहुल कटगेरे याने कागवाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भाग्यश्रीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.