नवी दिल्लीः देशामध्ये अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी आहेत जे चर्चेत असतात. मग टीना डाबी असोत की अन्य कुणी? यातच एक असेही आयएएस अधिकारी आहे जे देशातल्या सगळ्यात श्रीमंत आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.
परंतु ते महिन्याला केवळ एक रुपया वेतन घेतात, त्यामुळे त्यांची चर्चा देशभर होत आहे. महिन्याला केवळ एक रुपया वेतन घेणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याचं नाव आहे अमित कटारिया. असं असूनही त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. कटारिया हे मुळचे हरियाणातल्या गुरुग्राम इथले आहेत. सध्या छत्तीसगड येथे त्यांची पोस्टिंग आहे.
तब्बल सात वर्षांच्या सेंट्रल वर्षांच्या सेंट्रल डेप्युटेशननंतर ते माघारी परतले आहेत. देशातल्या सर्वात श्रीमंत अधिकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते. विशेष म्हणजे ते अनेकदा बातम्यामध्ये झळकताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीदरम्यान त्यांनी काळ्या रंगाचा चष्मा लावला होता. त्यामुळे ते चर्चेत आलेले होते.
अमित कटारिया एका उद्योजग कुटुंबातून येतात. रियल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शच्या व्यवसायात त्यांचे कुटुंबिय आहेत. त्यांचा व्यवसाय दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात पसरलेला आहे. या व्यवसायातून कटारिया कुटुंबाला मोठी कमाई होते.रिपोर्ट्सनुसार, कटारियांची नेटवर्थ ८ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. वर्ष २०२१ मध्ये अमित कटारिया यांचे बेसिक वेतन ५६ हजार रुपये होतं. इतर भत्ते मिळून त्यांचं वेतन १.४० लाख रुपयांपेक्षा जास्त होतं. परंतु ते केवळ एक रुपया सॅलरी घेतात, यामुळे चर्चेत असतात. याशिवाय त्यांच्या पत्नी अस्मिता हांडा कमर्शियल पायलट आहेत. त्यांचे वेतनही लाखोंमध्ये आहे.2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बस्तर दौऱ्यात कटारिया यांनी मोदींना भेटताना गडद चष्मा घातला होता. ही बाब सरकारी प्रोटोकॉलच्या विरोधात आहे. त्यामुळे अमित कटारिया यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना बस्तरमधून प्रतिनियुक्तीवर दिल्लीला बोलावण्यात आले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.