राजस्थानच्या जालोरमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. घरातील एसीमुळे घराला लागलेल्या आगीत आईसह तिच्या दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. एकाच वेळी घरातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरातील लोक स्तब्ध झाले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. जालोरमधील महावीर चौराहा परिसरातील एका घरात ही हृदयद्रावक घटना घडली.
कविता ठाकूर (वय, ३५), मुलगा ध्रुव ठाकूर (वय,१०) आणि मुलगी गौरवी ठाकूर (वय ५) अशी मृतांची नावे आहेत. कविता यांचा पती चेतन कुमार हा एका खासगी शाळेत शिक्षक असून तो कामानिमित्त सिरोही येथे गेला. तर, कविता यांची सासू नातेवाईकाच्या घरी गेली होती. कविता आणि त्यांची दोन्ही मुले घरात एकटीच होती. दरम्यान, रविवारी दुपारी शेजाऱ्यांना चेतन कुमार यांच्या घरातून धूर येत असल्याचे समजले.यानंतर शेजाऱ्यांनी चेतन कुमारच्या घराकडे धाव घेऊन त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, मात्र दरवाजा आतून बंद होता. यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी चेतन कुमार यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता कविता आणि त्यांची दोन्ही मुले जमीनीवर जखमी अवस्थेत आढळून आली. तसेच घरातील सर्व काही जळून खाक झाले होते.
घटनेची चौकशी सुरू
यानंतर पोलिसांनी तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवले. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नसून घरातील एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी अस्कमित मृत्युची नोंद केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.