सांगली, दि.१८ : गेल्या दहा वर्षात सांगलीवाडीमध्ये आपण जास्तीत जास्त विकास कामे केली आहेत. यापुढेही आणखी निधी देऊन सांगलीवाडी विकासात आदर्श बनवू, असे प्रतिपादन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केले.
आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचारासाठी सांगलीवाडीत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात प्रचारफेरी काढण्यात आली. त्यावेळी श्रीराम मंदिरासमोर झालेल्या सभेत ते बोलत होते. माजी आमदार दिनकरतात्या पाटील अध्यक्षस्थानी होते.
आमदार गाडगीळ म्हणाले, सांगलीवाडीने मला दोन्ही निवडणुकात साथ दिली आहे. या निवडणुकीत पूर्वीपेक्षाही अधिक मताधिक्य मला मिळेल याचा विश्वास आहे. सांगलीवाडीत विकासाच्या बाबतीत निधी अजिबात कमी पडू दिला जाणार नाही.
दिनकरतात्या पाटील म्हणाले, सांगलीवाडीतील अनेक प्रश्न सुधीरदादा गाडगीळ यांनी सोडवले आहेत. रस्ते, गटारी, पिण्याच्या पाण्याचा विषय मार्गी लावला आहे. सांगलीवाडीतील कामासाठी त्यांनी कधीही पैसे कमी पडू दिलेले नाहीत. यापुढेही त्यांच्याकडून आपल्याला आणखी भरीव मदतीची अपेक्षा आहे आणि ती ते निश्चितच पूर्ण करतील.
दिनकरतात्या पाटील म्हणाले, शासनाची लाडकी बहीण योजना क्रांतिकारक आहे. तिची माहिती घराघरात पोहोचली आहे. पुन्हा एकदा सर्वांना या योजनेच्या महत्त्वाची आठवण करून द्या. महायुती शासनाच्या विविध योजना तसेच सुधीरदादांनी केलेले काम घरोघरी जाऊन सांगा.लोकांना पटवून द्या. सुधीरदादांना आपल्याला भरघोस मताधिक्य द्यायचे आहे.
भाजप नेते संजय मोरे म्हणाले, सत्तेत असताना काँग्रेसवाल्यांनी गोरगरिबांच्या विकासासाठी काही केले नाही. महायुती शासनाने आता अनेक योजना आणल्या तर त्या योजनांवर त्या पक्षाचे नेते टीका करीत आहेत. सुधीरदादांनी गेल्या दहा वर्षात कमी बोलून जास्त काम केले आहे. त्यामुळे याखेपेस त्यांना रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य द्यायचे आहे.भगवान हरुगडे,शिवाजीराव पाटील,सचिन देशमुख,युवा नेते अजिंक्य पाटील यांचीही भाषणे झाली. सांगलीवाडीत दादांचे आगमन झाल्यावर ढोल -ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. श्रीराम मंदिरात दादांनी दर्शन घेतले. त्यानंतर प्रचार फेरीला प्रारंभ झाला.मोहिते गल्ली, हारुगडे कॉर्नर, झेंडा चौक ,हारुगडे प्लॉट, सांगलीवाडी सोसायटी, नवयुवक चौक, समता चौक, श्री बाळूमामा मंदिर परिसर, विठ्ठल मंदिर परिसर या मार्गे प्रचार फेरी निघाली. श्रीराम मंदिराच्या प्रांगणातच प्रचार फेरीची सांगता झाली.
या प्रचारफेरीत माजी आमदार दिनकरतात्या पाटील, माजी सभापती अजिंक्य पाटील,सदाभाऊ पाटील, राहुल पाटील, शरद देशमुख, प्रवीण पाटील, शंकर पाटील, हर्षल फल्ले, महेश मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.
फोटो
सांगली :आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचारासाठी सांगलीवाडीत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात प्रचार फेरी काढण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.