सांगली दि.९: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - नोव्हेंबर २०२४ साठी महाविकास आघाडीचा जाहिरनामा अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. खासदार मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते यांच्या उपस्थितीत रविवार दि. १०नोव्हेंबर रोजी दुपारी १२.००वा प्रसिद्ध केला जाणार आहे.
मा. प्रांताध्यक्ष आमदार मा. नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार सांगली येथील काँग्रेस भवनात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण(Live Telecast)दु. १२ वा सुरु करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व पत्रकार बंधू - भगिनी, सांगली शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व विविध आघाड्या, विभाग व सेलचे प्रमुख व सदस्य आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी. केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.