Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सत्‍यजित देशमुखांचा मार्ग सुकर, सम्राट महाडिक यांची माघार

सत्‍यजित देशमुखांचा मार्ग सुकर, सम्राट महाडिक यांची माघार
 

शिराळा मतदारसंघातील भाजपमधील बंडखोरी थोपविण्यात पक्षाला यश आले आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार सम्राट महाडिक यांनी निवडणूकीतून माघार घेत पक्षाचे उमेदवार सत्यजित देशमुख यांचा प्रचार करणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. यामुळे शिराळा मतदारसंघात आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार मानसिंग नाईक व भाजपचे सत्यजित देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे.

सम्राट महाडिक म्हणाले, मला उमेदावरी मिळाली नाही तसेच येथील उमेदवारी जाहीर करताना आम्हाला विचारात घेतले नाही. यामुळे आम्ही निश्चीतच नाराज होतो. पण आमची नाराजी सत्यजित देशमुख यांच्यावर नव्हे तर पक्षावर होती. मुंबईतील बैठकीतही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्यासमोर आम्ही आमची नाराजी व्यक्त केली. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येण्यासाठी शिराळा मतदार संघाचाही वाटा असावा या भावनेने मी पक्षासाठी माझी उमेदवारी सोमवारी मागे घेत आहे. दोन दिवस कार्यकर्त्यांशी चर्चा करुन मी हा निर्णय घेतला आहे.

सत्यजित देशमुख म्हणाले, सम्राट महाडिक व राहूल महाडिक या बंधूंनी घेतलेला निर्णय पक्षहिताचा आहे. भविष्यात पक्ष निश्चीतच त्यांचा योग्य सन्मान करेल. आमच्यात कोणतेच मतभेद नाहीत. सम्राट महाडिक यांनी माघार घेतल्याने मला मोठी ताकत मिळाली आहे. लोकसभेप्रमाणे येथे आम्ही एकदिलाने काम करुन निश्चीतच परिवर्तन घडवू. राहूल महाडिक म्हणाले, सत्यजित देशमुख आमचे विरोधक नाहीत. मात्र कार्यकर्त्यांच्या भावना तिव्र होत्या. त्यामुळे बंडखोरीचा निर्णय घेतला होता. आता पक्षाबरोबरच राहण्याचा आमचा निर्णय झाला आहे.

शिवसेनेचे आनंदराव पवार, गौरव नायकवडी यांच्याशी चर्चा करुन इस्लामपूरचाही निर्णय लवकरच जाहीर करु. यावेळी राजन महाडिक, माजी नगरसेवक कपील ओसवाल, सतीश महाडिक, केदार नलवडे, अमीत ओसवाल, चेतन शिंदे, डाँ. सचीन पाटील, सुजीत थोरात, भगवान जाधव, हणमंत पाटील, बबन शिंदे, भास्कर कदम, संपत देशमुख, सुरेखा पाटील, राहूल कदम, अभिजित जाधव, इसाक वलांडकर, प्रा.महेश जोशी, रघुनाथ बागडी, जगन्नाथ माळी, सरगम मुल्ला, निजाम मुलाणी उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.