Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माजी खासदार संजय पाटील यांचे संपत्तीपेक्षा कर्ज अधिक

माजी खासदार संजय पाटील यांचे संपत्तीपेक्षा कर्ज अधिक
 

माजी खासदार संजय पाटील यांनी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावे ४२ कोटी १३ लाख १७ हजार ८९८ रुपयांची स्थावर व जंगम संपत्ती नमूद करण्यात आली आहे.

पत्नी ज्योती यांच्या नावावर ३६ कोटी ४६ लाख २ हजार ९४३ रुपयांची जंगम मालमत्ता नोंद आहे. संजय पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवित आहेत. त्यांनी शेती व उद्योग असे उत्पन्नाचे साधन म्हणून नमूद केले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी ४८ कोटी ३१ लाख ३९ हजार रुपये इतकी एकूण संपत्ती दाखविली होती. त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. मनाई आदेश असताना तासगावात बैठक घेतल्याचा व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

संपत्तीचे विवरण
जंगम मालमत्ता ३,४९,२७,८९८
स्थावर मालमत्ता ३३,०९,९०,०००
वारसाहक्काची संपत्ती ५,५४,००,०००
एकूण देणी ५३,२५,९६,१०५
संपत्तीपेक्षा कर्ज अधिक

संजय पाटील यांच्या नावे म्हैसाळ येथील बिरेश्वर सहकारी क्रेडिट सोसायटीचे ४६ कोटी ३७ लाख २२ हजार ५९६ रुपये, तर तासगाव अर्बन सहकारी बँकेचे १ कोटी २८ लाख ५५ हजार ७४९ रुपयांचे कर्ज आहे. अन्य देणी मिळून त्यांच्या नावे ५३ कोटी २५ लाख ९६ हजार १०५ रुपयांचे कर्ज नमूद आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.