Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मंत्र्याला मारले म्हणून कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झालेली नाही

मंत्र्याला मारले म्हणून कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झालेली नाही
 

पुणे: महामार्गावर एखादा अपघात घडला म्हणजे महामार्ग खराब आहे असे नाही. त्याच पद्धतीने मुंबईत एका गँगस्टरने मंत्र्याला मारले म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा उद्ध्वस्त झालेली नाही. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था नियंत्रणात असून, बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात आत्तापर्यंत २१ जणांना अटक केली आहे.

कारागृहाच्या आतून चालणाऱ्या टोळ्यांचे काम कधीच समर्थनीय नाही, असे भाजपचे नेते, पुण्याचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी सांगितले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रवक्ते संदीप खर्डेकर, अमोल कविटकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते.

सत्यपाल सिंग म्हणाले,'गेल्या १० वर्षापासून देशात आणि विविध राज्यात भाजपची सत्ता आहे. त्या ठिकाणी आम्ही 'सब का साथ सबका विकास' हे तत्त्व पाळून विकास कामे केली. कोणाचेही लांगुलचालन न करता सर्वांना समान न्याय दिला.

पोलिस खात्यात ३५ वर्ष काम केले, त्या काळी कुठे ना कुठे बॉम्बस्फोट होत होत. पण गेल्या १० वर्षात पंजाबमध्ये दोन, बेंगलूरमध्ये एक असे तीन बॉम्बस्फोट झाले, अन्य कोणत्याही शहरात काही झाले नाही. नक्षलवादावर नियंत्रण आणला असून, धार्मिक दंगलींचे प्रमाणही कमी झाले आहे.
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था चांगली असल्यानेच येथे परकीय गुंतवणूक वाढत आहे. ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन भाजपने केले, त्यांचे आता उद्‍घाटनही होत आहेत. लाडक्या बहिणीला महिन्याला १५०० रुपये दिले जात होते, आता २१०० रुपये मिळतील, किसान सन्मान योजनेतून १५ हजार रुपये मिळणार आहेत. रस्ते, विमानतळ, बंदर बांधले. रोजगार उपलब्ध केला आहे. राज्यातील महायुतीचे सरकार हे पारदर्शी, प्रभावी आहे, त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सत्ता येईल, असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला.

समाजाने आवाज उठवावा
पुण्यात पब, अमली पदार्थांची विक्री व सेवन वाढले आहे, त्याबाबत सत्यपाल सिंग म्हणाले, अमली पदार्थ आणि सायबर गुन्हे ही जागतिक समस्या आहे. यावर पोलिस कारवाई करत आहेतच, पण समाजातील नागरिकांना एकत्रित येऊन यावर आवाज उठवणे गरजेचे आहे. तरच हे प्रकार रोखले जातील.

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.