पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ बिसूर येथे भव्य पदयात्रा संपन्न
:, बिसूरकरांचा पृथ्वीराज पाटील यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा
निर्धार
सांगली दि.१८: प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी मतदार संघात शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात जोरदार मुसंडी मारली आहे. नांद्रे, कुपवाड, हरीपूर, खोतवाडी वाजेगाव, माधवनगर, बुधगाव, अंकली, धामणी इ. भागात पदयात्रेतून प्रचाराचा धुरळा उठवला.
बिसूर येथे दत्त मंदीरात प्रचाराचा नारळ फोडून पदयात्रा सुरु झाली. स्टँड - दत्त मंदिर - दर्गा - ग्रामपंचायत - हरीजन वस्ती - सरकारी शाळा - रणझुंजार मंडळ-दिग्विजय चौक - गणपती मंदीर - तरुण मंडळ-तासगाव रस्ता - जुने स्टँड ते दत्त मंदिराजवळ पदयात्रेची सांगता झाली. यावेळी ग्रामस्थ पदयात्रेत पृथ्वीराज पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देत होते. महिला औक्षण करून विजयाचा आशीर्वाद देत होते.
यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, 'ग्रामीण भागातील जनतेच्या विकासाला माझे प्राधान्य राहील. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी विधानसभेत आवाज उठवणार आहे. खोतवाडीचा पूल मंजूर करून घेतला त्यासाठी पावणे दोन कोटी निधी मिळवला. गेल्या निवडणुकीत बिसूर, खोतवाडी व वाजेगाव मतदारांनी चांगले लिड दिले आहे. याहीवेळी मला चांगले लिड देतील. मी पाच वर्षांत राबलोय.. अनेक कामे केली. आता पुन्हा पाच वर्षे तुमच्यासाठी द्या. आमदार कसा असतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. पदयात्रेत ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन रावसाहेब, माजी चेअरमन, संचालक, पृथ्वीराज पाटील फौंडेशनचे पदाधिकारी व सदस्य आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.