Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! पत्नी अन् ३ मुलांची हत्या करून पती जीवन संपवायला निघाला, तितक्यात...

धक्कादायक! पत्नी अन् ३ मुलांची हत्या करून पती जीवन संपवायला निघाला, तितक्यात...
 

इटावा: उत्तर प्रदेशातील इटावा इथं एका सराफा व्यावसायिकाने पत्नी आणि ३ मुलांना विष देऊन ठार केले त्यानंतर चौघांच्या मृतदेहासोबत सेल्फी घेत सर्वकाही संपलं असा स्टेटस ठेवला. पत्नी आणि मुलांचे मृतदेह घरात ठेवून तो सुसाइड करण्यासाठी रेल्वे रुळावर जाऊन झोपला मात्र त्याला पोलिसांनी अटक केलं. इटावाच्या कोतवाली परिसरातील लालपुरा येथील ही घटना आहे. याठिकाणी सराफा व्यावसायिकाने पत्नी रेखा, मोठी मुलगी भाव्या, छोटी मुलगी काव्या आणि मुलाला आधी विष देऊन ठार केले.

 
पत्नी आणि मुलांच्या मृत्यूनंतर आरोपी मुकेश वर्मा आत्महत्या करण्यासाठी रेल्वे स्टेशनजवळ पोहचला. त्याठिकाणी रेल्वे रुळावर तो झोपला. थोड्यावेळात तिथे मरुधर एक्सप्रेस ट्रेन गेली मात्र त्याला काही झाले नाही. त्यानंतर त्याला रेल्वे पोलिसांनी पकडले. एकाच वेळी ४ लोकांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ माजली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह अनेक पोलीस घटनास्थळी पोहचले. मृत महिलेच्या मोठ्या भावाने आणि मुलांचा मामा सत्येंद्र सोनी यांनी सांगितले की, या घटनेबाबत मुकेश वर्मा खुलासा करू शकतात. त्याने असे का केले, कुटुंबात कुठलाही वाद नव्हता. मुकेशच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले. एक मुलगा पहिल्या बायकोचा आहे.
 

दरम्यान, मुकेश वर्मा सराफा व्यावसायिक म्हणून काम करतात. त्यांच्या पहिल्या पत्नीचं २००५ साली निधन झाले, त्यानंतर मुकेश यांनी दुसरं लग्न केले होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी पोलीस पोहचले तेव्हा ४ मृतदेह आढळले. त्यात पत्नी, २ मुली आणि एका मुलाचा समावेश होता. मुकेश वर्माला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तो रेल्वे स्टेशनवर आत्महत्येसाठी गेला होता. प्राथमिक तपासात मुकेश वर्माचे घरगुती वाद सुरू होते. कौटुंबिक वादातून तणावात येत या सर्वांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. मृतकांच्या गळ्याभोवती काही खूणा आढळत आहेत. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून नेमकं यामागचं कारण काय हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय कुमार वर्मा यांनी दिली. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.