Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या चौफेर विकासासाठी सुधीरदादांना पुन्हा विजयी करा डॉ. प्रमोद सावंत

सांगलीच्या चौफेर विकासासाठी सुधीरदादांना पुन्हा विजयी करा डॉ. प्रमोद सावंत हॉटेल चालक, बार असोसिएशन बैठक
 

सांगली, दि. ९ : सांगलीचा  आणखी गतीने चौफेर विकास करण्यासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना सांगलीतून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन भाजप नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे केले. येथे हॉटेल चालक-मालक असोसिएशन तसेच बार असोसिएशन यांच्यामार्फत मुख्यमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संवाद कार्यशाळा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, सलग दहा वर्षे सुधीरदादांनी सांगली विधानसभा मतदारसंघात रस्ते ,पूल, ड्रेनेज सिस्टीम अशी अनेक कामे केली आहेत. मागणीमुक्त आणि समस्यामुक्त सांगली  हा त्यांचा पुढील पाच वर्षाचा अजेंडा आहे. सांगली शहरासह मतदारसंघात एकही समस्या शिल्लक ठेवाय lची नाही असा निश्चय त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी सांगलीतील जनतेने ठामपणे उभे राहिले पाहिजे.

ते म्हणाले, सांगलीच्या विकासाची सुरू झालेली ही परंपरा पुढे कायम ठेवण्यासाठी सुधीरदादा गाडगीळ तिसऱ्यांदा आमदार होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार निश्चितच येणार आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आहे.त्यामुळे सुधीरदादा गाडगीळ मुंबई आणि दिल्ली येथील सरकारच्या मदतीने सांगलीसाठी आणखी निधी आणतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केल्याप्रमाणे सांगलीजवळ लवकरच विमानतळ उभा राहील.

सावंत म्हणाले, सांगलीमध्ये 'सिंगल विंडो क्लीयनर्स' व्यवस्था असावी.तसेच  हॉस्पिटलिटी कोर्स सुरू करावेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या पर्यटन विकास योजनांचाही सांगलीसाठी लाभ करून घेता येईल. त्यासाठी सुधीरदादा गाडगीळ निश्चितच पाठपुरावा करतील.

संजय परभणी परमणे आणि एडवोकेट बाळासाहेब देशपांडे यांची भाषणे झाली. हॉटेल चालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश पवार, लहू बडेकर, श्रीपाद कोमकर, आदित्य बावडेकर, मिलिंद खिलारे, युवा नेते गौतम पवार, उल्हास चिप्रे, योगेश कुलकर्णी, अशोक सावंत, सतीश कुंभार, रमेश शेट्टी, एडवोकेट कुंभार, एडवोकेट अमोल बोळाज, शैलेश पाटील, माधव कुलकर्णी, सर्जेराव मोहिते, प्रवीण गोंधळे तसेच बार असोसिएशन व हॉटेल चालक-मालक असोसिएशन सदस्य  उपस्थित होते. 

फोटो कॅप्शन 
 
1) सांगली: सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या प्रचारासाठी आलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे स्वागत करण्यात आले.
 
2) सांगली: आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीच्या वेळी सांगली जिल्हा वकील संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य यांच्यासमवेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
 
3) सांगली: आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीच्या वेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या समवेत सांगली हॉटेल चालक मालक असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.