Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जयश्री मदन पाटील यांच्यावरच अन्याय, म्हणूनच अपक्ष उमेदवारी- उदय पाटील - काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीच दिली कबुली

जयश्री मदन पाटील यांच्यावरच अन्याय, म्हणूनच अपक्ष उमेदवारी - उदय पाटील  - काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीच दिली कबुली 


सांगली : सांगलीतील काँग्रेसच्या नेत्या, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष, मदन भाऊ पाटील यांच्या पत्नी व मदनभाऊ युवा मंच, सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आधारस्तंभ जयश्री पाटील यांच्यावरच अन्याय झाला आहे हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा ते मान्य केले आहे. त्यामुळेच जयश्री पाटील यांची अपक्ष उमेदवारी योग्यच असून ज्या वसंतदादांनी सांगलीतच नव्हे महाराष्ट्रात काँग्रेस वाढवली, रुजवली त्याच दादांचे वारसदार काँग्रेस विचारांच्या विरोधात कधीच जाणार नाहीत व भाजपला मदत करण्याचा विचारही त्यांच्या मनात येणार नाही असा दावा काँग्रेसचे युवा नेते, मदनभाऊ युवा मंचचे माजी अध्यक्ष उदय पाटील यांनी केला आहे.

श्री पाटील यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे, सांगलीवाडी येथे नुकतीच काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांची सभा झाली.या सभेतच त्यांनी जयश्री पाटील यांना दिलेला शब्द पाळण्यात  कमी पडलो अशी कबुली दिली. यापूर्वीही एकदा जयश्री पाटील यांना पद देण्याचे, पक्षाकडून ताकद देण्याचे मान्य केले होते.मात्र त्याची पूर्तता पक्षाने केली नाही. श्रीमती पाटील यांना महीला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष पद हे राज्य मंत्रीपद दर्जाचे पद द्यायचे होते मात्र ते देण्यात कमी पडलो असे श्री थोरात यानीच स्पष्ट केले.
उदय पाटील म्हणाले, ज्येष्ठ नेते श्री थोरात यांनीच जयश्री मदन पाटील यांना न्याय देण्यात कमी पडल्याची कबुली दिली आहे. आणि म्हणूनच त्यांना या विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यावा लागला. श्रीमती पाटील यांना विधान परिषदेचा शब्द देण्यात आला असेलही मात्र राज्यभरातुन सुमारे बाराशे लोकांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. त्यापैकी केवळ शंभर लोकांना उमेदवारी देण्यात आली. उर्वरित हजार -अकराशे लोकांपैकी किती लोकांना विधान परिषदेचे आश्वासन दिले असेल व मागील अनुभव पाहता हे आश्वासन तरी पूर्ण होईल का याची खात्री नसल्याने आम्ही कार्यकर्त्यांनीच जयश्री पाटील यांना ही निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला. म्हणूनच श्रीमती पाटील या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आहेत. त्यांना कार्यकर्त्यांमधून तसेच सामान्य जनतेतून मोठा प्रतिसाद मिळत असून त्याच विजयाच्या दावेदार आहेत. काँग्रेस पक्षाचे उमेदवार नव्हे तर अपक्ष उमेदवार जयश्री पाटील याच भाजपच्या उमेदवाराचा पराभव करू शकतात हे नक्की आहे हे 23 तारखेला सांगलीसह पूर्ण राज्याला कळेल असे श्री पाटील यांनी स्पष्ट केले.
      
अपक्ष तरीही काँग्रेस सोबत
वसंतदादांच्या मुळे काँग्रेसचे विचार वसंतदादा घराण्याच्या रक्तारक्तात मुरलेले आहेत त्यामुळे या घरातील लोकांनी अपक्ष निवडणूक लढवली तरीसुद्धा विजयानंतर ते काँग्रेसलाच पाठिंबा देतात हा इतिहास आहे. 2004 साली मदनभाऊ पाटील हे सुद्धा अपक्ष म्हणून निवडून आले मात्र ते लगेचच काँग्रेसचे सहयोगी सदस्य झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विशालदादा पाटील हे सुद्धा अपक्ष म्हणून निवडून आले मात्र तरीसुद्धा ते तात्काळ काँग्रेसचे सहयोगी सदस्य म्हणून काँग्रेस सोबत राहिले. सध्याच्या सांगली विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील या सुद्धा वेगळे काही करणार नसून त्या सुद्धा काँग्रेसच्या विचाराच्याच आहेत व काँग्रेस सोबतच राहणार यामध्ये मात्र तिळमात्र शंका नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.