'राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींना 'कुत्ते की मौत मरेंगा' म्हणाले, कंगनाच्या वक्तव्यामुळे खळबळ
वर्धा : नेहमी आपल्या या ना त्या विधानामुळे कायम चर्चेत असणारी अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. वर्ध्यामध्ये झालेल्या सभेमध्ये राहुल गांधींवर टीका करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कंगनाने भलताच दावा केला आहे. राहुल गांधी यांच्यावर बोलताना पंतप्रधानांबद्दल राहुल गांधी यांनी कुत्ते की मौत मरेगा, असं विधान केल्याचा आरोप केला आहे. वर्ध्यामध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेसाठी कंगना रनौत आली होती. यावेळी तिने केलेल्या भाषणामुळे एकच हश्शा पिकली. लाडकी बहिण योजनाही पंतप्रधान मोदींनी आणल्याचा दावाच तिने केला आहे.
"काँग्रेसचा शहजादा राहुल गांधी पंतप्रधान मोदींना हिटलर आहे, कुत्ते की मौत मरेगा, तो रावण आहे दहा डोक्याचा अश्या गोष्टी राहुल गांधी करतात, पंतप्रधानांना काही आठवत नाही, असं राहुल गांधी बोलत असल्याचा खळबळजनक आरोप कंगना राणावत यांनी केला.
तसंच, 'राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींबद्दल नेहमी टीका करतात. कधी हिटलर म्हणतात तर कधी त्यांनी कुत्ते की मौत मरेगा, असं विधान केल्याचा आरोप केला असा दावाच कंगनाने केला. पण हे विधान राहुल गांधी यांनी नेमकं कुठे आणि केव्हा केलं. याचा मात्र भाषणात उल्लेख करणे कंगनाने टाळलं आहे. यानंतर भाजप खासदार कंगनाने आपलं भाषण आटोपतं घेतलं आहे.
काय म्हणाली कंगना रनौत?
आज काँग्रेसचा शहजादा आहे राहुल गांधी. आज राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. पंतप्रधान मोदी यांचा आता लक्षात राहत नाही. पंतप्रधान राहुल गांधी हे रावण, हिटलर, कुत्ते के मोत मरेंगा, असं काही काही म्हटलंय. अशा प्रकारचं हे वक्तव्य ते करतात कारण पंतप्रधान मोदी हे गरीब घरातील व्यक्त आहे. एका गरीब आईचा मुलगा आहे. जर ते एका गरीब आईचा मुलगा नसते, त्यांच्या आईने दुसऱ्यांच्या घरात जाऊन धुणीभांडी केली, कपडे धुवून मुलांचा सांभाळ केला नसता आज ते पंतप्रधान लाडकी बहीण योजना आणली नसती"
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.