Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

छावा क्रांतीवीर सेना यांचा जयश्री पाटील यांना पाठिंबा

छावा क्रांतीवीर सेना यांचा जयश्री पाटील यांना पाठिंबा
 

सांगली, ता.१४ : सांगली विधानसभा क्षेत्रात ४०  वर्षानंतर एक सक्षम महिला उमेदवार निवडणुकीसाठी उभी आहे. सांगली शहराचा विकास आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी जयश्री पाटील कटिबद्ध असल्याचे मत छावा क्रांतिवीर सेना सांगली जिल्हाचे अध्यक्ष दिपकभाऊ मुळीक यांनी व्यक्त केले.
           
अपक्ष महिला उमेदवार जयश्री पाटील यांना अठरापगड जातीच्या मावळ्यांची छावा क्रांतिवीर सेना या संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष  करण गायकर यांच्या आदेशानुसार व छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली छावा क्रांतीवीर सेना सांगली जिल्हा (सर्व आघाडी) यांच्या वतिने जाहीर देण्यात आला.
       
छावा क्रांतीवर सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जयश्री मदन पाटील यांचा सांगली विधानसभा क्षेत्रात प्रचार करतील. जयश्री मदन पाटील यांना भरघोस मताधिक्याने निवडून देण्याची ग्वाही छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
 
यावेळी कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र प्रसाद रेळेकर, सरचिटणीस पश्चिम महाराष्ट्र सुनील बापट, प्रदेश संपर्कप्रमुख नितीन शिंदे, सांगली जिल्हाप्रमुख दीपक मुळीक, सांगली जिल्हा रिक्षा असोसिएशन अध्यक्ष महेश रेपे, जिल्हा संपर्कप्रमुख नितीन पाटील, आशिष मुळीक, हर्षद कुंभार,सौ. मयुरी निकम,सौ. श्रुती गुळवने,सौ अश्विनी नरगुंदे, गणेश मुळीक यासह पदाधिकारी उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.