Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजेतील प्रतिष्ठित लॅन्ड ब्रोकर व मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष नुकतेच भाजपात प्रवेश केलेले श्री सुधाकर खाडे यांचा खून

मिरजेतील प्रतिष्ठित लॅन्ड ब्रोकर व मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष नुकतेच भाजपात प्रवेश केलेले श्री सुधाकर खाडे यांचा खून 
 
ब्रेकिंग न्यूज!मिरजेतील प्रतिष्ठित लॅन्ड ब्रोकर व मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष नुकतेच भाजपात प्रवेश केलेले श्री सुधाकर खाडे यांच्यावर  कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला.सिनर्जी हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू. जागेचे वादातून हल्ला झाल्याचे समजते..




मालमत्तेच्या कारणातून हत्या झाल्याची माहिती 

मिळालेल्या माहितीनुसार मिरज-पंढरपूर रस्त्यावर ही घटना घडली होती. प्राथमिक माहितीनुसार मालमत्तेच्या कारणातून ही हत्या झाली आहे. सध्या सुधाकर खाडे हे भाजपच्या स्टार्टअप इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते. 2014 मध्ये त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. 

2014 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती

मीरज-पंढरपूर रस्त्यावर सुधाकर खाडे यांच्यावर खुनी हल्ला झाला होता. या हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर त्यांना उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. खाडे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला शिवसेनेतून सुरुवात केली होती. खाडे यांनी 2014 साली तासगाव-कवठेमहांकाळ या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. 

पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात

या प्रकरणाशी निगडित पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पंढरपूर रोड येथील राम मंदिराजवळ असलेल्या जागेत प्रॉपर्टीच्या कारणावरून खाडे यांचा एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. याच वादातून संशयित व्यक्तीने खाडे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. यातच खाडे यांचा मृत्यू झाला. कुऱ्हाडीने वार केल्यानंतर खाडेयांना जखमी अवस्थेत मिरजेतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मृत असल्याचे घोषित केले. सदर घटनेबाबत घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून याबाबत एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.