Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लिफ्ट नसती मागितली असती तर.., प्रियांकाच्या मृत्यूने सगळेच हादरले, साताऱ्यातील घटना

लिफ्ट नसती मागितली असती तर.., प्रियांकाच्या मृत्यूने सगळेच हादरले, साताऱ्यातील घटना
 

साताऱ्यातील कराडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एका दुचाकीला भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात लिफ्ट मागून दुचाकीवर बसलेली महिला जागीच ठार झाली आहे तर दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

जखमीला व्यक्तीला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका अमोल जाधव (वय-31, रा. संजयनगर, मसूर ता. कराड) असx अपघातात ठार झालेल्या महिलेचं नाव आहे. तर मनोहर आनंदा नायकवडी असं अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे.

मनोहर नायकवडी हे आपल्या स्प्लेडर दुचाकी (क्रमांक एम एच १० सी जी १६९५) वरून चाफळकडे गेले होते. काम आटपून ते परत घरी वाळवा इथं जात होतं. पुणे बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर तासावडे टोल नाक्यावर पोहोचले. त्यावेळी प्रियांका जाधव यांनी "माझी गाडी चुकली आहे, मला कराडमध्ये सोडा अर्जंट काम आहे" असं सांगून लिफ्ट मागितली. माणुसकी म्हणून नायकवडी यांनी या महिलेला मदत केली. दोघेही दुचाकीवरून कराडकडे येत होते. महामार्गावर येथील पंकज हॉटेल समोर आले असता, पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनानं दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, नायकवडी हे गाडीसह बाजूला पडले. तर प्रियांका या महामार्गावरच पडल्यामुळे वाहनाचे चाक अंगावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या.

अपघात होताच आसपासच्या नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. मात्र धडक देणारे वाहन अपघातस्थळावरून पसार झालं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. तर जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पसार झालेल्या वाहन चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.