कोल्हापूर : जिल्ह्यातील करवीर तालुक्यामध्ये भयंकर घटना घडली आहे. करवीर तालुक्यातील केर्ले गावामध्ये शाळेचं गेट अंगावर पडून सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
केर्लेमधील कुमार हायस्कूलमध्ये ही घटना घडली. स्वरूप माने असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सहावीमध्ये शिकत होता. शाळेमध्ये लघूशंकेसाठी जात असताना शाळेचं गेट त्याच्या अंगावर पडल्याने जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्याला तातडीने रुग्णालयामध्ये तातडीने उपचारासाठी हलवण्यात आलं होतं. मात्र, उपचारापूर्वीच मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने आईचाही मृत्यू
दरम्यान, दवाखान्यात नेलेल्या मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच आईनेही प्राण सोडल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात घडली. आई व मुलाचा एका तासाच्या अंतराने मृत्यू झाला. या घटनेने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. चंद्राबाई भैरू कांबळे (वय 85) व संभाजी भैरू कांबळे (वय 55) अशी माय-लेकाची नावे आहेत.संभाजी मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ करत होते. आई चंद्राबाई गेली दोन वर्षे अर्धागवायूचा झटका आल्याने अंथरुणावर खिळून होत्या. सोमवारी (18 नोव्हेंबर) छातीत दुखू लागल्याने संभाजी यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. मुलाच्या निधनाचे वृत्त समजताच आईनेही देह सोडला. एकाच दिवशी माय- लेकाच्या मृत्यूची बातमी समजताच हळहळ व्यक्त होत आहे. संभाजी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, नातू, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.