Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
 

महायुतीची होणारी बैठक दोन दिवस पुढे ढकलत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे गावामध्ये गेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, शिंदेंचे विश्वासू नेते संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याने गावी गेले असल्याचे सांगितले.

संजय शिरसाट म्हणाले, राजकीय पेच प्रचंग येतो तेव्हा मुख्यमंत्री साहेबांना विचार करण्यासाठी वेळ हवा असतो. त्यावेळी ते आपल्या गावी जातात. त्यांच्या गावात फोन लागत नाही. तेथे रेंज नाही. उद्या संध्याकाळ पर्यंत ते आपला निर्णय घेतील.

मोठा निर्णय म्हणजे एकनाथ शिंदे सत्तेतून बाहेर पडून विरोधी पक्षनेते पद घेणार का? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये गृहमंत्रिपद दिलेच तर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याची चर्चा आहे. गृहमंत्रिपद दिली नाही तर एकनाथ शिंदे सरकारमध्ये कोणतेही मंत्रिपद न घेता आपल्या विश्वासू नेत्याला उपमुख्यमंत्री करतील, असे सांगितले जात आहे.
सत्तेत राहणे गरजेचे

महायुतीला मिळालेल्या भव्य यशात विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला मिळणार नाही. त्यामुळे शिवेसेनेने विरोधी पक्षनेते पद घ्यावे आणि सत्तेतून बाहेर पडावे, असा एक विचार प्रवाह होता. मात्र, शिवसेनेतील फूटीनंतर शिवसेनेतील नेते मंडळी आपल्याकडे टिकवण्यासाठी एकनाथ शिंदेंना सत्तेत राहणे आवश्यक झाले आहे.

अजितदादांनी बिघडवले शिंदेंचे गणित
अजित पवार यांनी निकाल जाहीर होताच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दर्शवली. त्यामुळे एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पाॅवर कमी झाली. निकालानंतर अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढताना दिसत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचे सत्तासमिकरणाचे गणित बिघडल्याचे दिसत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.