मला तोंडघशी का पाडलं? कोल्हापुरात राजकीय ड्रामा! मधुरिमाराजेंनी अर्ज मागे घेतल्यानं सतेज पाटील अन् शाहू महाराज यांच्यात वाद
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यावरुन कोल्हापुरात मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज आणि सतेज पाटील यांच्यामध्ये वाद झाला आहे. या वादाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. मधुरिमाराजे यांनी अचानक अर्ज मागे
घेतल्यानं हा सर्व प्रकार घडला. यामुळं कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसचा
अधिकृत उमेदवार दिसणार नाही.
कोल्हापुरात राजकीय ड्रामा
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकत उमेदवार मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं हा वाद निर्माण झाला. या मतदारसंघातून काँग्रेसचे नेते राजेश लाटकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पण आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्यानं लाटकर हे ३ वाजेपर्यंत वेळ असताना वेळेत आलेच नाहीत. त्यामुळं नाईलाज झाल्यानं मधुरिमाराजे यांना आपला अर्ज मागे घ्यावा लागला. पण मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही, असा आरोप करत मला तुम्ही तोंडघशी पाडलतं, असा आरोप सतेज पाटील यांनी खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्यावर केला.
सतेज पाटील नेमकं काय म्हणाले?
या राजकीय घडामोडींदरम्यान काँग्रेस नेते सतेज पाटील हे मालोजीराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर भडकल्याचे पाहायला मिळाले. शाहू महाराजांकडं सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तुम्ही जे केलं ते बरोबर नाही, माघार घ्यायचीच होती तर आगोदर का नाही सांगितलं? मला तोंडघशी का पाडलं? माझी नाचक्की का केली? असा सवाल सतेज पाटील यांनी शाहू महाराज आणि मालोजीराजे यांना केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.