Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :-विमा कंपनीने वकील रुग्णाला साडेचार लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश

सांगली :- विमा कंपनीने वकील रुग्णाला साडेचार लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश 


विमा पॉलिसीच्या दरम्यान झालेल्या शस्त्रक्रियेची रक्कम व्याज व भरपाईसह सुमारे साडेचार लाख रुपये लाईफ इन्शुरन्स कॉररेशन ऑफ इंडिया (एलआयसी) यांनी विमाधारक ॲड. गिरीष तपकिरे यांना देण्याचे आदेश सांगली येथील ग्राहक न्यायालयाने दिले आहेत. 
  
 उपचारासाठी झालेले खर्चापोटी ४ लाख २५ हजार, विमान नाकारल्याच्या दिनांक पासून या रकमेवर ६ टक्के व्याज, मानसिक त्रासापोटी २० हजार रुपये, तक्रारी अर्जाचा खर्च म्हणून १० हजार रुपये ४५ दिवसात एलआयसी ने ॲड. तपकीरे यांना देण्याचे आदेश प्रमोद गो. गिरी गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती मनीषा वनमोरे व श्रीमती अर्पिता फणसळकर यांच्या पिठाने दिले आहेत. 
    
 सांगली येथील ॲड. गिरीश दत्ताजीराव तपकिरे यांनी ३१ मार्च २००८ ते २०२९ या काळासाठी एलआयसी कंपनीची हेल्थप्लस विमा पॉलिसी उतरवली होती. त्यासाठी त्यांनी वार्षिक १८ हजार प्रमाणे २ लाख ८८ हजार रुपये विमा कंपनीकडे जमा होते. दरम्यानच्या काळात त्यांना पाठदखीचा त्रास होऊ लागल्याने मिरज येथील एका दवाखान्यामध्ये ५ मार्च २०२३ रोजी इंडोस्कोपीक स्टेनिओसिस पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 
     
 पॉलिसीच्या अटीप्रमाणे तपकिरे यांनी उपचारासाठी झालेला खर्चाची मागणी विमा कंपनीकडे २० मार्च २०२३ रोजी केली. ५२ तासापेक्षा कमी काळासाठी तपकिरे दवाखान्यामध्ये ॲडमिट होते या कारणावरून विमा कंपनीने भरपाई देण्यास नकार दिला. म्हणून तपकिरे यांनी ॲड. सिद्धार्थ शहा यांच्यामार्फत सांगली येथील ग्राहक न्यायालयामध्ये तक्रार केली होती. विमा कंपनीने ग्राहकाला म्हणजेच रुग्णाला सदोष सेवा दिल्याचे शाबित झाल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.