Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

युवाशक्तीचे एक मत सांगली अधिक चांगली करु शकते.. पोलिसांना चांगली वेतनश्रेणी व निवासस्थान मिळालं पाहिजे... शासकीय क्रिडांगणावर सिंथेटिक ट्रॅक आणि सांगलीत आयटी पार्क उभारणी करणार :-पृथ्वीराज पाटील यांची ग्वाही

युवाशक्तीचे एक मत सांगली अधिक चांगली करु शकते.. पोलिसांना चांगली वेतनश्रेणी व निवासस्थान मिळालं पाहिजे...  शासकीय क्रिडांगणावर सिंथेटिक ट्रॅक आणि सांगलीत आयटी पार्क उभारणी करणार  - पृथ्वीराज पाटील यांची ग्वाही
 

सांगली दि.१३: पोलिस प्रशिक्षणानंतर तुमची निवड व्हावी यासाठी माझ्या शुभेच्छा. पोलिसांना चांगली वेतनश्रेणी व निवासस्थान यासाठी शासन दरबारी आवाज उठवणार आहे. सांगलीच्या विद्यमान आमदारांनी दहा वर्षांत सांगलीत एकही मोठा उद्योग आणला नाही. त्यामुळे तरुणांच्या हाताला काम नाही. बेरोजगारीमुळे तरुणाईची उपासमार होत आहे. पाच वर्षे काम करत सांगलीच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पुढच्या पाच वर्षांसाठी आमदार म्हणून सेवेची संधी द्या .. सांगलीत आयटी पार्क उभे करुन युवा वर्गाला स्वावलंबी बनवणार आहे. संवाद सांगलीसाठी या उपक्रमांतर्गत विविध घटकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आहेत.

सांगली अधिक चांगली करण्यासाठी त्यांच्या सूचना घेऊन पाच वर्षाचा सांगलीच्या नवनिर्माणाचा रोडमॅप तयार केला आहे.तो राबवण्यासाठी आणि सांगली अधिक चांगली करण्यासाठी तुमचे एक मत मला उर्जा देणारे आहे. आमदार म्हणून विधानसभेत खेळाडू व युवा वर्गाचे प्रश्न मांडून तरुणाईच्या कल्याणाचे उपक्रम सांगलीत आणण्यासाठी माझा प्राधान्यक्रम राहील.पोलीस भरतीसाठी तुम्ही जीवाचं रान करताय.. पोलीस खात्यात तुम्ही जाणार आहात..पोलिसांची  नोकरी म्हणजे जसं जनसेवेचे चांगले माध्यम आहे तसे या खात्यात पोलिसांना आव्हानंही आहेत. पोलिस नोकरीत तुम्हाला त्रास होणार नाही अशी व्यवस्था करण्यात मी शासन दरबारी आवाज उठवणार आहे.. 

सांगलीकरांना विद्यमान आमदारांनी अळिमिश्रीत पाणी पाजवलं.. खड्डेमय रस्ते, अस्वच्छता ,बेरोजगारी, महागाई यामुळे सांगली अस्वस्थ आहे. ही देणगी गाडगिळांची आहे. भाजपा हा केवळ जाती धर्मात भांडणं लावून फूट पाडून जनतेचं नुकसान करणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्ष सर्वसामान्य नागरिकांना बरोबर घेऊन विकास करणारा आहे. मला सांगलीकरांना शुध्द व मुबलक पाणी पुरवठा करायचा आहे. चांगले रस्ते, गटारी करायच्या आहेत. खेळाडूना चांगली मैदानं उपलब्ध करून द्यायची आहेत. शासकीय ग्राऊंडवर सिंथेटिक ट्रॅक बनवायचे आहेत. विजयनगर मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील व सांगली जिल्ह्य़ातील पहिले सिंथेटिक ट्रॅक तयार करत आहे.त्यासाठी हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले. यावेळी शंभूराज काटकर,राहूल कांबळे, नितीन तावदारे, प्रदीप पाटील, अविनाश वाघमारे, मोहसिन शेख, अजय माने, सुधाकर कांबळे व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.