Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपाने आता माझा विचार करू नये; 'खुल्लमखुल्ला' चर्चेत मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उद्विग्न

भाजपाने आता माझा विचार करू नये; 'खुल्लमखुल्ला' चर्चेत मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उद्विग्न
 

मुंबई : भाजपाचे आक्रमक नेते, आमदार ऍड. आशिष शेलार यांनी 'आपलं महानगर'शी संवाद साधताना विधानसभा निवडणुकीत महायुती बहुमताने विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. मुंबईतील सर्व 16 जागा जिंकत 'शतप्रतिशत' भाजपाचा दावा करतानाच, मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदाबाबत त्यांनी 'कळ आतल्या जिवाची' व्यक्त केली.

ऍड. आशिष शेलार हे मुंबई भाजपाचे अध्यक्षपद तिसऱ्यांदा भूषवित आहेत. बहुदा माझा अभ्यास अजूनही नीट झालेला नसावा, म्हणून पुन्हा मुंबई अध्यक्षपद देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असावा, अशी टिप्पणी त्यांनी केली. पुढे जाण्याची इच्छा प्रत्येकाचीच असते. आता तिसऱ्यांदा मुंबई अध्यक्ष झालो आहे, याच्या पुढे काय? पण, यापुढे मी वेगळ्या पदावर काही काम करावे, असे माझ्या काही वरिष्ठांना वाटते का? असा माझ्या मनात प्रश्न आहे, अशा शब्दांत त्यांनी मनातील सल व्यक्त केली. तसेच माझ्यावर अन्याय झालेला नाही, मला सर्वकाही पक्षाने दिले आहे, मी समाधानी आहे. कदाचित, मी इथपर्यंतच काम करावे, असेच मूल्यमापन पक्षाचे तर नाही ना, असे मला वाटत आहे. म्हणून मी पक्षाशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत मुंबईचे चित्र काय असेल? असे विचारले असता आमदार आशिष शेलार म्हणाले, महायुती म्हणून मुंबईतील 36 पैकी 35 जागांवर उमेदवार दिले आहेत. यात भाजपाच्या प्रत्यक्षात 16 जागा असून कोट्यातील एक जागा भाजपाने रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दिली आहे. तर, उर्वरित 18 पैकी 3 जागांवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असून त्यातील एका उमेदवाराला (नवाब मलिक) आमचा पाठिंबा नाही. तर, अन्य 15 जागा एकनाथ शिंदे यांची शिवसेना लढत आहे. यापैकी सर्व 16 जागा जिंकेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीत सहभागी नाहीत, असे सांगतानाच, राज्यात महायुतीचेच सरकार स्पष्ट बहुमताने पुन्हा सत्तेवर येईल. त्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजपा, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइंचा समावेश असले. तथापि, राज्यात भाजपाचे किती उमेदवार जिंकतील, हे आता मला सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.